Home /News /money /

आता PAN Card वरही घेऊ शकता पर्सनल लोन; अगदी सोपी आहे प्रक्रिया, लक्षात ठेवा फक्त ही एक अट

आता PAN Card वरही घेऊ शकता पर्सनल लोन; अगदी सोपी आहे प्रक्रिया, लक्षात ठेवा फक्त ही एक अट

पॅनकार्डच्या आधारे कर्ज घेताना कर्ज ज्या बँकेकडून घेणार आहात, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं को-लॅटरल (NO Call letter needed ) ठेवण्याची गरज नाही. म्हणजेच बँकेकडे काहीही गहाण न ठेवताही तुम्हाला पर्सनल लोन देतात

मुंबई 04 ऑगस्ट : अनेकदा आपल्यापुढे अचानक आर्थिक समस्या उभी राहते. अशावेळेस आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याचा सगळ्यांत सोपा उपाय म्हणजे पर्सनल लोन (Personal Loan) असं समजलं जातं. पण पर्सनल लोनसाठी बँकेत अर्ज दाखल केल्यानंतर, विविध प्रकारची कागदपत्रं जमा करण्यापासून अनेकदा अनेक अडचणी येतात आणि आपल्याला हवी ती रक्कम कर्ज म्हणून मिळवण्यासाठी प्रचंड त्रास होतो. पण आता तुम्ही अगदी सहजपणे कोणत्याही कटकटींशिवाय पर्सनल लोन घेऊ शकता, तेही फक्त तुमच्या पॅनकर्डवर. बहुतेक बँका तुमच्या पॅनकार्डच्या आधारे साधारणपणे 50 हजार रुपयांपर्यंतचं कर्ज (Personal Loan On PAN Card) देतात. KYE नियमांतर्गत तुम्ही तुमच्या पॅनकार्डवर कोणत्याही कटकटीशिवाय पर्सनल लोन मिळवू शकता, असं कर्ज देणाऱ्या एनबीएफसी बजाज फिनसर्व्ह कंपनीने म्हटलं आहे. तुमची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठीचा हा सगळ्यांत सोपा उपाय आहे. तुमचं उत्पन्न, पैसे फेडण्याची क्षमता, कर्ज परतफेडीचा कालावधी या सगळ्या गोष्टींचा हिशेब करून तुमची बँक कर्जाची रक्कम कमी किंवा जास्त करू शकते. PM Suraksha Bima Yojana: दरमहा फक्त 1 रुपये जमा करा, सरकार देईल 2 लाख रुपयांचा लाभ काही गहाण न ठेवता कर्ज पॅनकार्डच्या आधारे कर्ज घेताना कर्ज ज्या बँकेकडून घेणार आहात, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं को-लॅटरल (NO Call letter needed ) ठेवण्याची गरज नाही. म्हणजेच बँकेकडे काहीही गहाण न ठेवताही तुम्हाला पर्सनल लोन देतात. अर्थात पॅनकार्डवर मिळणारं पर्सनल लोन हे असुरक्षित लोनच्या कॅटेगरीमध्ये येतं. त्यामुळेच या माध्यमातून मोठ्या रकमेचं कर्ज द्यायला बँका परवानगी देत नाहीत. होम लोन किंवा ऑटो लोनप्रमाणे पर्सनल लोनची रक्कम खर्च करण्यात कोणताही अडथळा किंवा त्याबाबत कोणताही नियम नसतो. घरखरेदी करण्यासाठी किंवा घराची दुरुस्ती करण्यासाठी बँका होम लोन देतात. पण पर्सनल लोनची रक्कम ही तुम्ही तुमच्या वैयक्तिक कोणत्याही खर्चासाठी वापरू शकता. म्हणजेच पर्सनल लोनची रक्कम तुम्ही वैद्यकीय उपचार किंवा फिरण्यासाठी, ट्रीपसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठीही वापरू शकता. Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज करा ही अट पूर्ण करणं बंधनकारक पॅनकार्डवर दिलं जाणारं पर्सनल लोन मिळवण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला अगदी काही सर्वसाधारण कागदपत्रं सादर करावी लागतात. त्यामध्ये तुमचा वर्क एक्सपरिअन्स (Work Experience) म्हणजे कामाच्या अनुभवाबाबतची कागपत्रंही समाविष्ट आहेत. पॅनकार्डवर पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदाराकडे कमीतकमी दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्जदाराचा स्वत:चा व्यवसाय असो किंवा नोकरी करणारा पण किमान दोन वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे. तसंच त्याचा क्रेडिट स्कोअरही चांगला असणं आवश्यक आहे. अन्य कोणत्याही पर्यायापेक्षा पॅनकार्डवर कर्ज घेणं तसं सोपं आहे. फक्त वर उल्लेख केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Loan, Pan card

पुढील बातम्या