आता घरबसल्या पाहता येणार PF बॅलेन्स, असं करा अर्ज

आता या सोप्या पाच पद्धतीने प्रोव्हिडेट फंडातील शिल्लक रक्कम तुम्हाला जाणून घेता येणार आहे.

  • Share this:

कर्मचाऱ्यांना आता प्रोव्हिडेंट फंड जाणून घेण्यासाठी HR डिपार्टमेंटकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या ऑफिसमधून किंवा घरातूनही तुमचं पीएफ बॅलेन्स तपासू शकता.

यूजरला आता युनिफाईड पोर्टलऐवजी पीएफ पासबुक वेगळ्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या पोर्टलवर पीएफ बॅलेन्स तपासण्यासाठी PF क्रमांकासोबत UAN क्रमांक जोडलेलं असावं. पण पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी युनिफाईड पोर्टलचं काम करू शकतं.

तुमच्याकडे UAN क्रमांक नसेल तरीही पीएफ बॅलेन्स ऑनलाईन तपासता येतं फक्त यासाठी तुमच्याकडे पीएफ खातं असणं गरजेचं आहे. हा क्रमांक तुम्हाला पगाराच्या पावतीवरून मिळेल. वेबसाइटवर जाऊन आपआपलं राज्य आणि प्रादेशिक कार्यालय निवडल्यानंतर योग्य ती माहिती नमुद करा. मग पीएफ बॅलेन्स संबंधित मेसेज तुमच्या मोबाईलवर येतो.

तुम्ही जर UAN क्रमांक अॅक्टिव्हेट केलं असेल तर तुमच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी एम्प्लॉईज प्रोव्हिडेट फंड ऑर्गनायजेशनकडे झालेली आहे. यानंतर तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्डकॉल केल्यावर तुमचा पीएफ क्रमांक, नाव, जन्मतारीख अशा सर्व माहिती एम्प्लॉईज प्रोव्हिडेट फंड ऑर्गनायजेशनच्या (EPFO) SMS द्वारे मिळते.

EPFO SMS सेवेच्या माध्यमातून तुम्ही प्रोव्हिडेट फंडात असलेली रक्कम जाणून घेता येऊ शकते. 07738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुम्ही बॅलेन्सची माहिती मिळवू शकता. ज्या व्यक्तीनं UAN अॅक्टिव्हेट केलं असेल त्यांच्यासाठी ही सुविधा मर्यादेत आहे.

उमंग अॅपच्या साहाय्याने पीएफ बॅलेन्स तपासू शकता. सर्वप्रथम उमंग अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून EPFO यावर क्लिक करा. यानंतर एम्प्लॉय सेंट्रिक सर्विसेसचं पेज ओपन होईल. यात तुम्हाला View Passbook पर्याय निवडून त्यात तुमचा UAN आणि मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे पीएफ बॅलेन्स तपासता येऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 05:33 PM IST

ताज्या बातम्या