2 लाख रुपयांत सुरू करा बिझनेस, मोदी सरकार करणार मदत

2 लाख रुपयांत सुरू करा बिझनेस, मोदी सरकार करणार मदत

जर तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आहे. हा बिझनेस तुम्ही 2 लाख रुपये गुंतवून सुरू करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : जर तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर एक चांगली संधी आहे. हा बिझनेस तुम्ही 2 लाख रुपये गुंतवून सुरू करू शकता.नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेटने यासाठी एक अहवाल तयार केला आहे. याअंतर्गत मुद्रा योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपयांचं कर्ज स्वस्त दरात मिळतं.

एकूण खर्च किती?

या अहवालानुसार केवळ 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने 30 हजार किलोग्रॅम उत्पादन क्षमता तयार होईल. हा बिझनेस सुरू करण्यासाठी एकूण 6 लाख 5 हजार रुपये खर्च येईल.

फिक्स्ड कॅपिटल

या एकूण खर्चात फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. फिक्स्ड कॅपिटलमध्ये 2 मशिन, पॅकेजिंग इक्विपमेंट असे खर्च येतात.

वर्किंग कॅपिटल

वर्किंग कॅपिटलमध्ये कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यांचा पगार, 3 महिन्यांसाठी लागणारा कच्चा माल आणि युटिलिटी प्रॉडक्टचा खर्च येतो. त्याशिवाय भाडं, वीज, पाणी आणि टेलिफोनचा खर्चही आहे.

(हेही वाचा : रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा)

4 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज

6 लाख रुपये एकूण भांडवलापैकी तुम्हाला तुमच्याकडचे 2 लाख रुपये टाकावे लागतील. सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला 4 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळेल. यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यात सगळा तपशील द्यावा लागेल.मुद्रा योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या बिझनेसचा चांगल्या प्रकारे विस्तार करू शकाल.

========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या