नवी दिल्ली, 2 जानेवारी : नवीन वर्षात आता एलपीजी बुक करण्यासाठी लांब रांगांबरोबरच कॉल करण्याचीही गरज भासणार नाही. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलने या वर्षी मिस्ड कॉल सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे लोकांना गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी केवळ आपल्या फोनवरुन एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.
देशभरात सुरू झाली सुविधा
संपूर्ण देशात ही सेवा कंपनीने सुरू केली आहे. 8454955555 नंबरवर ग्राहकांना आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन कॉल करावे लागेल. यासाठी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. सध्याच्या आयवीआरएस (इंटरॅक्टिव वॉईस रिस्पॉस सिस्टम) कॉल व्यवस्थेमध्ये कॉलसाठी सर्वसामान्य दर लावला जातो. इंडियन ऑईलकडून जारी केलेल्या एका विधानानुसार ही सुविधा आयवीआरएस प्रणालीत नसणाऱ्यांना आणि ज्येष्ठांना उपयुक्त ठरणार आहे.
भुवनेश्वरमधून झाली सुरुवात
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात 'मिस्ड कॉल' सुविधा सुरू केली. यावेळी त्यांनी द्वितीय श्रेणी ग्लोबल-ग्रेड प्रीमियम ग्रेड पेट्रोल (ऑक्टेन 100) देखील आणले. ते म्हणाले की, एलपीजीच्या बाबतीत देशाने पुढील पाऊल उचललं आहे. 2014 च्या पहिल्या सहा दशकात एलपीजी कनेक्शन सुमारे 13 कोटी लोकांना उपलब्ध करुन देण्यात आले. गेल्या सहा वर्षांत हा आकडा 30 कोटींवर पोहोचला आहे.
अशा प्रकारे मिळेल सुविधा
या मिस्ड कॉल सुविधेसाठी आपल्याला फक्त एक गोष्ट करावी लागेल. रिफिल बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8454955555 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. असे केल्यावर आपल्याला आपल्या संदेशाद्वारे माहिती मिळेल. यावरुन आपले सिलिंडर बुक केले गेले आहे की नाही याची माहिती मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.