मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBIची नवीन घोषणा! लगेच बदला तुमचं जुनं चेकबूक, अन्यथा...

RBIची नवीन घोषणा! लगेच बदला तुमचं जुनं चेकबूक, अन्यथा...

बँकेचे व्यवहार धनादेश म्हणजेच चेकमार्फत करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने संपूर्ण देशामध्ये चेक ट्रंकेशन सिस्टम (Cheque Truncation System- CTS) सप्टेंबर 2020 पासून लागू करण्याची घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : बँकेचे व्यवहार धनादेश म्हणजेच चेकमार्फत करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने संपूर्ण देशामध्ये चेक ट्रंकेशन सिस्टम (Cheque Truncation System- CTS) सप्टेंबर 2020 पासून लागू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच सप्टेंबर 2020 नंतर नॉन सीटीएस चेक (Non-CTS Cheque) स्वीकारण्यात येणार नाही. जर तुमच्याकडे सुद्धा जुनं चेकबूक असेल तर त्वरीत तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन नवीन चेकबूक घेऊन येणं आवश्यक आहे. CTS पद्धती अंतर्गत धनादेश प्रत्यक्ष पाठवण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्याची कॉपी पाठवली जाते. RBI ने 2010 मध्येच ही व्यवस्था आणली होती. सध्या काही मोठ्या शहरांमध्ये ही व्यवस्था अंमलात आणली जात आहे. त्याचप्रमाणे अनेक बँकांनी 1 जानेवारी 2020 पासूनच नॉन-सीटीएस चेक क्लिअर करणं बंद केलं आहे. जर तुमच्या चेकबूकवर ‘CTS-2010 Cheque’ लिहीलेलं नसेल तर याचाच अर्थ असा की तुमचं चेकबूक नॉन-सीटीएस आहे. देशातील सर्व बँकांमध्ये 1 जानेवारी 2013 पासूनच सीटीएस पद्धती (CTS 2010) लागू करण्यात आली होती. काय आहे चेक ट्रंकेशन सिस्टम? CTSमध्ये चेक क्लिअर करण्यासाठी केवळ इलेक्ट्रॉनिक कॉपी द्यावी लागेल. या पद्धतीमध्ये धनादेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी लागणारी मेहन कमी होणार आहे. त्याकरता लागणाऱ्या वेळेतही घट होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिकच सुखकर होणार आहे. संपूर्ण जगभरात याच प्रक्रियेचा अवलंब केला जातो. जुना धनादेश असाल तर काय कराल? जर तुमच्याकडे जुना म्हणजे नॉन सीटीएस चेक/धनादेश असेल तर तुम्हाला बँकेतून नवीन चेकबूक आणावं लागेल. यासाठी कोणतच अधिक शुल्क बँकेकडून आकारण्यात येणार नाही. भारतात डिजिटल व्यवहार वेगाने वाढतायत. त्यामुळे ही प्रक्रिया सुरळित होईल. रिझर्व्ह बँक नियमितपणे डिजिटल व्यवहारांबद्दलचा अहवाल तयार करेल. यामुळे देशभरात डिजिटल व्यवहार किती सुरळित होतात याची माहिती मिळू शकेल.डिजिटल व्यवहारांमुळे ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण होईल आणि पैशाच्या देवाणघेवाणीत पारदर्शकता येईल. याबद्दलची रुपरेखा एप्रिल 2020 पर्यंत तयार होईल आणि सप्टेंबरपासून ही प्रणाली अस्तित्वात येऊ शकेल.
First published:

पुढील बातम्या