नवी दिल्ली, 19 मे: देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचे म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) तुम्ही जर ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर अकाउंटशी रजिस्टर्डमोबाईल क्रमांक (Registered Mobile Number) तुम्हाला बदलायचा असेल,तर हे काम तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने करु शकता. स्टेट बॅंकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन (Online) आणि ऑफलाईन (Offline) पध्दतीने मोबाईल क्रमांक बदलण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. घरबसल्या अत्यंत सोप्या पध्दतीने मोबाईल क्रमांक बदलण्याची सोपी पध्दत जाणून घेऊया...
अकाउंटला जोडलेला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तुम्हाला एटीएम-डेबिट कार्ड तसेच अॅक्टिव्हेटेड मोबाईल क्रमांकाची आवश्यकता आहे. तसेच याव्यतरिक्त ओटीपीच्या (OTP)मदतीने देखील तुम्ही तुमचा अकाउंटशी संलग्न मोबाईल क्रमांक बदलू शकता.
हे ही वाचा-LIC ची ही योजना देते महिना 9000, उत्पन्न वाढवण्यासाठी कशी करायची गुंतवणूक?
असा बदलू शकता अकाउंटशी संलग्न मोबाईल क्रमांक
- अकाउंटशी संलग्न मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एसबीआयच्या वेबसाईटवर जाऊन लॉग-इन (Log-in)करावे लागेल.
- डावीकडे दिलेल्या नेव्हिगेशन मेन्यू तीलMy Accounts and Profileवर क्लिक करावे.
- आता ड्रॉप डाऊन मेन्यूतीलprofileया ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतर पर्सनल डिटेल्स/मोबाईलवर या ऑप्शनवर क्लिक करावे.
- आता प्रोफाइल पासवर्ड टाकावा. त्यानंतर सबमिट वर क्लिक करावे.
- त्यानंतरChange Mobile Number – Domestic Only (Through OTP/ATM/Contact Center)या ऑप्शनवर क्लिक करावे.
- ही प्रक्रिया केल्यावर एक नवे पेज ओपन होईल.
- त्यावर तुम्हालाPersonal Details – Mobile Number Updateअसे लिहीलेले दिसेल.
- त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर हा मेसेजVerify and Confirm Your Mobile Number XXXXXXXXXXयावर क्लिक करावे.
- आताOKवर क्लिक करावे.
- यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर 3 ऑप्शन दिसतील. ते असे दोन्ही मोबाईल क्रमांकावर ओटीपीच्या माध्यमातून,इंटरनेट बॅंकींग अप्रुव्हल थ्रु एटीएम,आणि अप्रुव्हल थ्रु कॉन्टॅक्ट सेंटर.
-आता दोन्ही क्रमांकावर आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आपला अकांऊटशी संलग्न मोबाईल क्रमांक बदलू शकता.
अकाउंटशी संलग्न मोबाईल क्रमांक ऑफलाईन पध्दतीने कसा बदलायचा
या व्यतरिक्त तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन देखील अकाउंट शी संलग्न मोबाईल क्रमांक बदलू शकता. यासाठी तुम्हाला बॅंकेच्या शाखेत एक अप्लिकेशन फॉर्म मिळेल. मात्र त्य़ासोबत तुम्हाला ओळखपत्रही सादर करावे लागेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि तो फॉर्म बॅंकेला सबमिट करावा लागेल. त्यानंतर काही दिवसांतच तुमचा अकाउंटशी संलग्न मोबाईल क्रमांक बदलला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi account