खुशखबर, आता झीरो बॅलन्स खातेधारकांसाठी चेकबुक आणि ATM कार्ड मोफत

खुशखबर, आता झीरो बॅलन्स खातेधारकांसाठी चेकबुक आणि ATM कार्ड मोफत

RBI नं काही नियम शिथिल केलेत. त्याचा फायदा बँक ग्राहकांना होतोय.

  • Share this:

मुंबई, 11 जून : बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट ( बीएसबीडी ) असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर. RBI नं काही नियम शिथिल केलेत. या खातेधारकांना चेक बुक आणि इतर सुविधा आता उपलब्ध होतील. आता बँक ग्राहकांना या सुविधांसाठी खात्यात कमीत कमी पैसे ठेवण्याची सक्ती करू शकत नाही. पूर्वी असं नव्हतं. खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागे. पण आता सर्व नियम बदललेत.

या सुविधा मिळतील मोफत

RBI नं बँकांना बचत खात्याप्रमाणे बीएसबीडी खात्यालाही सुविधा द्यायला सांगितलंय. यात कुठल्याही शुल्काशिवाय कमीत कमी सुविधा दिली जायची.  रिझर्व्ह बँकेनं सांगितलं, बँकेनं काही ठराविक सेवांबरोबर चेक बुकसारखी सुविधाही द्यावी.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; IT विभागाच्या डागळलेल्या 12 अधिकाऱ्यांना ‘नारळ’

कोकण किनारपट्टीसह गोव्यात हाय अलर्ट, समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचं आवाहन

अजून काही मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी बँक स्वतंत्र आहे. बीएसबीडी खातेधारकांना कमीत कमी पैसे खात्यात ठेवण्याची गरज नाही.

रेल्वेत आहेत नव्या व्हेकन्सीज्, 28 जूनपर्यंत 'या' पदांसाठी करा अर्ज

एटीएममधून चार वेळी मोफत पैसे काढू शकतील

बीएसबीडी खातेधारकांना आपल्या खात्यात कमीत कमी पैसेही ठेवण्याची गरज नाही. त्यांना एटीएम सेवाही चार वेळा फ्री मिळणार आहे. तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे ठेवायचे याला मर्यादा नाही.

याचा फायदा अनेकांना होणार आहे. बरेच जण बँकेनं निश्चित केलेली रक्कम खात्यात ठेवू शकत नाहीत. त्यांना इतर सुविधा मिळणं अवघड जातं होतं. पण आता RBIनं सर्वांना हा दिलासा दिलाय.RBIनं सर्वसामान्यांचा विचार करून बरेच निर्णय घेतलेत.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे रेपो रेट 6.0 टक्क्यांवरून आता 5.75 टक्क्यांवर आलाय. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचा फायदा होणार. पैसे वाचणार.

 

भर रस्त्यात जावयावर सपासप वार, VIDEO व्हायरल

First published: June 11, 2019, 12:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading