मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' गोष्टींची घ्या काळजी, पैशांची भासणार नाही कमतरता

'या' गोष्टींची घ्या काळजी, पैशांची भासणार नाही कमतरता

जवळपास प्रत्येकालाच कधी ना कधी पैशाची चणचण भासत असते. मात्र, तुम्ही काही नियम जर पाळले तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

जवळपास प्रत्येकालाच कधी ना कधी पैशाची चणचण भासत असते. मात्र, तुम्ही काही नियम जर पाळले तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

जवळपास प्रत्येकालाच कधी ना कधी पैशाची चणचण भासत असते. मात्र, तुम्ही काही नियम जर पाळले तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

मुंबई, 24 डिसेंबर : मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र, राजकारण अशा जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये चाणक्य (Chanakya) यांना सखोल ज्ञान होतं. त्याआधारे त्यांनी अर्थशास्त्र (Economics) लिहिलं. चाणक्यांनी आपल्या उपदेशामध्ये देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) महत्त्वाचं स्थान दिलं आहे. पैसा (Money) ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. आपल्या इच्छेप्रमाणं जीवन जगण्यासाठी पैशांची गरज भासतेच. हिंदू देव-देवतांपैकी देवी लक्ष्मीला धनाची देवता म्हटलं जातं. लक्ष्मीच्या कृपेनं माणसाच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात. आपल्या घरामध्ये नियमितपणे पैसा येण्यासाठी लक्ष्मीची कृपा (Lakshmi's blessings) असणं अत्यंत आवश्यक आहे, असं मानलं जातं. आर्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, अशा काही जागा आहेत जिथे देवी लक्ष्मी नेहमी वास्तव्य करते. जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीही पैशांशी संबंधित अडचणी येत नाहीत.

हिंदू धर्मशास्त्रात दान करण्याला प्रचंड महत्त्व दिलं गेलं आहे. आयुष्य सुधारण्यासाठी गोड वाणी, मदत, मैत्री, दान आणि पुण्य इत्यादींना प्राधान्य देण्यास सांगितलं आहे. चाणक्य सांगतात, की ज्या व्यक्ती दान (Charity) करतात, त्यांच्यावर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असते. समाजकार्यात भाग घेणाऱ्यांकडे लक्ष्मी कधीही पाठ फिरवत नाही. त्यामुळे चाणक्य दान-धर्म करण्याचा सल्ला देतात.

चाणक्यांच्या सांगण्यानुसार, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी बोलण्यात गोडवा असणं आवश्यक आहे. कटू बोलणाऱ्यांवर लक्ष्मी देवी कधीही कृपा करत नाही. कामाच्या ठिकाणी सर्वांशी एकरूप होऊन ज्या व्यक्ती काम करतात त्यांना लवकर यश मिळतं. म्हणून एकमेकांशी बोलताना वाणीमध्ये गोडवा ठेवावा. याचा अर्थ असा नव्हे, की विनाकारण एखाद्याची स्तुती करत बसावं.

जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या संपूर्ण List

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातल्या स्वच्छतेची (cleanness) पूर्ण काळजी घेतली पाहिजे. ज्या घरांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते, त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, असं चाणक्य सांगतात. घरामध्ये स्वच्छता असल्यास वातावरण प्रसन्न राहतं आणि घरातल्या व्यक्तींचं आरोग्यही (Health) चांगलं राहतं.

आर्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार, ज्या घरांत सतत वादविवाद असतात त्या घरांमध्ये लक्ष्मी वास करत नाही. याउलट ज्या कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये जिव्हाळा (Affaction) आणि पती-पत्नीमध्ये प्रेम (Love) असतं त्या कुटुंबात लक्ष्मीचा वास असतो.

चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आस्तिक आणि नास्तिक दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या फायद्याच्या आहेत. तुम्ही लक्ष्मीला मानत असाल तर या गोष्टी नक्की करा आणि तुम्ही नास्तिक असाल तरीही करण्यास हरकत नाही. कारण, यातल्या बहुतेक गोष्टींमुळे तुमचं आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत होईल.

Disclaimer : या लेखात दिलेली माहिती सामान्यपणे उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी घेत नाही आणि कुठल्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही.

First published:
top videos

    Tags: Acharya chanakya, Chanakya niti, Money