कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, सरकार या भत्त्यांमध्ये करणार कपात; वाचा का घेतला असा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Second wave of corona) देश लढत असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका मिळू शकता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक सुविधांमध्ये कपात केली जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Second wave of corona) देश लढत असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका मिळू शकता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक सुविधांमध्ये कपात केली जाणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 जून: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Second wave of corona) देश लढत असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका मिळू शकता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक सुविधांमध्ये कपात केली जाणार आहे. कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे देशाच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहेत. एकीकडे सरकारचा खर्च (Government Expenditure) वाढत चालला आहे तर दुसरीकडे महसुलात (Revenue)  मात्र घट होत आहे. अशावेळी कॉस्ट कटिंगची (Cost Cutting) ची झळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारने सर्व मंत्रालयं आणि विभागांच्या खर्चावर नियंत्रण आणण्यास सांगितले आहे. केंद्राने अनावश्यक खर्चावर अंकुश आणण्याचे आदेश दिले आहे. यामुळे ओव्हरटाइन भत्ता (Overtime allowance) यासारख्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभावर परिणाम होणार आहे. 20% कपात करेल सरकार देशामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढलेला असताना पहिल्यांदा केंद्र सरकार (Central government) सर्व मंत्रालयं आणि विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ओव्हरटाइम भत्ता आणि रिवॉर्ड्स सारख्या खर्चांमध्ये 20 टक्क्यांची कपात करेल. अर्थात आता नॉन-स्कीम खर्चामध्ये 20 टक्क्यांपर्यंत कपात केली जाईल. यामध्ये प्रवास भत्ता (Traveling Allowance) देखील समाविष्ट आहे. हे वाचा-Black Fungus चं औषध टॅक्स फ्री; कोरोना लशीवरील GST कायम; अर्थमंत्र्यांची घोषणा सरकारवर अतिरिक्त भार गुरुवारी, वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने (Department of Expenditure, Ministry of Finance) एक कार्यालयीन निवेदन दिले. यानुसार जादा खर्च थांबविण्यासाठी पावलं उचलण्यासंदर्भात सांगण्यात आले असून 20% कपात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दिवाळीपर्यंत देशभरात विनामूल्य कोरोना लस (Corona Vaccine) उपलब्ध करुन देण्यासाठी आणि गरीब कुटुंबांना मोफत रेशन (Free Ration) उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने आखलेल्या योजनेमुळे अतिरिक्त भार आहे. अशा परिस्थिती यामुळे वित्तीय तूट (Fiscal Deficit) अधिक होऊ शकते. हे वाचा-बचत खात्यामार्फत मिळवा चांगली रक्कम, या तीन बँका देतायंत सर्वाधिक व्याजदर या भत्त्यांवर होईल परिणाम या निवेदनानुसार ज्या खर्चांमध्ये कपात करण्यास सांगितली आहे त्यामध्ये ओव्हरटाइम भत्ता, रिवॉर्ड्स, देशांतर्गत प्रवास, परदेश प्रवासाचा खर्च, ऑफिस खर्च, भाडं, रेट्स आणि टॅक्स, रॉयल्टी, प्रकाशन, अन्य प्रशासनिक खर्च, पुरवठा आणि साहित्य, रेशनचा खर्च, पीओएल, कपडे आणि टेंटेड, जाहिरात आणि प्रसिद्धी, किरकोळ कामे, देखभाल, सेवा शुल्क, योगदान आणि इतर शुल्कांचा समावेश आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: