मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Good News: 11.8 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, केंद्र सरकारची मोठी घोषणा

Good News: 11.8 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, केंद्र सरकारची मोठी घोषणा

मिड डे मील या योजनेंतर्गत (Midday Meal Scheme) विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (DBT) माध्यमातून रक्कम पाठवली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी याबाबतची माहिती दिली आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

 दिल्ली 29 मे : मिड डे मील या योजनेंतर्गत (Midday Meal Scheme) विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (DBT) माध्यमातून रक्कम पाठवली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निशंक यांनी मिड डे मील योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व मुलांच्या भोजनासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या योजनेच्या माध्यमातून 11.8 कोटी विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. यामुळे मध्यान्ह भोजन योजनेला गती मिळेल. ही योजना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PM-GKAY) दरमहा सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना 5 किलो मोफत अन्नधान्याचे वितरण करण्याच्या भारत सरकारच्या योजनेपेक्षा वेगळी आहे.

हेही वाचा - बँकेचं दिवाळं निघालं तर बुडू शकतील 4.8 कोटी खाती; तुमचा पैसा सुरक्षित राहील का?

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत सांगितलं, की एमडीएम योजनेंतर्गत सरकार जवळपास 11.8 कोटी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार आहे. यासाठी फंडमध्ये आणखी 1200 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका! 1 जूनपासून प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

हा निर्णय लहान मुलांचं योग्य पोषण होण्याच्या दृष्टीनं मदत करेल. याशिवाय कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह याची मदत होईल. केंद्र सरकार यासाठी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 1200 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देईल. केंद्र सरकारच्या या विशेष कल्याणकारी उपाययोजनाचा फायदा देशभरातील 11.20 लाख सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सुमारे 11.8 कोटी विद्यार्थ्यांना होईल.

First published:

Tags: Money, Scheme