Home /News /money /

Edible oil Price: केंद्र सरकारच्या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमतींवर होणार परिणाम; तुमचा खर्च वाढणार की कमी होणार?

Edible oil Price: केंद्र सरकारच्या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमतींवर होणार परिणाम; तुमचा खर्च वाढणार की कमी होणार?

Edible Oil: केंद्र सरकारने पाळत (Surprise Inspections) ठेवण्याची मोहीम सुरू केली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि त्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी तेल-तेलबियांची साठवणूक आणि काळाबाजार थांबवणे हा त्याचा उद्देश आहे.

    मुंबई, 5 एप्रिल : सर्वसामान्य जनतेच महागाईने आधीच कंबरडं मोडलं आहे. वाढत्या महागाईच्या (Inflation) पार्श्वभूमीवर सरकारने खाद्यतेलाच्या किमती रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आता सरकारने पाळत (Surprise Inspections) ठेवण्याची मोहीम सुरू केली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि त्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी तेल-तेलबियांची साठवणूक आणि काळाबाजार थांबवणे हा त्याचा उद्देश आहे. देशात खाद्यतेलाची 60 टक्के गरज भागवण्यासाठी आयात केली जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) निर्माण झालेल्या जागतिक राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या काही महिन्यांत विविध खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. सरकारने विविध उपाययोजना करूनही दरात सातत्याने वाढ होत आहे. अन्न पुरवठा विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, सरकारने किमती रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. खाद्यतेल आणि तेलबियांची साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून तपासणी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय पथक विविध तेलबिया आणि खाद्यतेल उत्पादक राज्यांमध्ये तपासणी करत आहे. गाडी पेक्षा टोल महाग! ड्राव्हरच्या खात्यातून कापला 43 लाखांचा टोल; चूक मान्य पण कंपनीचा पैसे देण्यासही नकार साठवणुकीची मर्यादा वाढवली उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये तपासणी सुरू असल्याचे पांडे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत पाळत मोहीम अधिक तीव्र करणार आहे. इतर उपायांबद्दल त्यांनी सांगितले की सरकारने आधीच खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे. साठा मर्यादा वाढवली आहे. याव्यतिरिक्त किरकोळ विक्रेते निर्धारित कमाल किरकोळ किंमत (MRP) चे पालन करतात याची खात्री करण्यासाठी वारंवार बैठका सुरू आहेत. तीन महिन्यांत भावात मोठी वाढ सूर्यफूल तेलाबद्दल सुधांशू पांडेय म्हणाले की रशिया आणि युक्रेन हे दोन प्रमुख पुरवठादार देश आहेत. खासगी व्यावसायिक इतर देशांतून खाद्यतेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी असेल. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांत सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेलाच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. EPF खात्यातील रक्कम डोळे झाकून काढू नका; त्यावर Income Tax किती लागणार? समजून घ्या खाद्यतेलाच्या किमती किती वाढल्या? 4 एप्रिल रोजी सूर्यफूल तेलाची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 184.58 रुपये आहे जी 1 जानेवारी 2022 रोजी 161.71 रुपये प्रति किलो होती. सोयाबीन तेल 148.59 रुपयांवरून 162.13 रुपये किलो झाले आहे. पामतेल प्रतिकिलो 128.28 रुपयांवरून 151.59 रुपये किलो झाले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Money, Russia Ukraine

    पुढील बातम्या