मोदी सरकारने पेंशन स्कीममध्ये केले ५ बदल, निवृत्तीनंतर मिळणार टॅक्स फ्री पेंशन

मोदी सरकारने पेंशन स्कीममध्ये केले ५ बदल, निवृत्तीनंतर मिळणार टॅक्स फ्री पेंशन

नवीन पेंशन स्कीममध्ये केंद्र सरकाचं योगदान १० टक्क्यावरून १४ टक्के असणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ११ डिसेंबर २०१८- केंद्राने नव्या पेंशन स्कीममध्ये ५ महत्त्वपूर्ण बदलांना मंजूरी दिली आहे. नव्या पेंशन स्कीमला EEE चा दर्जा देण्यात येईल. पेंशन स्कीममध्ये बदल पुढच्या वित्तीय वर्षापासून म्हणजे १ एप्रिल २०१९ होणार आहे. अर्थमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘केंद्राने नवीन पेंशन स्कीममध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पेंशन स्कीममध्ये केंद्र सरकाचं योगदान १० टक्क्यावरून १४ टक्के असणार आहे. पेंशन स्कीमवरील ६० टक्के रक्कमेवर टॅक्स लागणार नाही.’

४० टक्क्यांनी वाढवलं योगदान- सरकारने केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना चांगली भेट दिली आहे. सरकारने नॅशनल पेंशन स्कीम (एनपीएस) मध्ये आपलं योगदान वाढवून मूळ वेतनाववर १४ टक्के केले आहे. हे सध्या १० टक्के आहे. यानंतरही कर्मचाऱ्यांचं योगदान १० टक्केच राहणार आहे. सरकार त्यांच्याकडून दिलं जाणारं योगदान वाढवणार आहे.

काय असतं EEE- पीपीएफप्रमाणे एनपीएसला ईईईचा (एक्झेम्प्ट- एक्झेम्प्ट- एक्झेम्प्ट) दर्जा मिळणार आहे. याचा अर्थ तीनही आघाड्यांवर गुंतवणुकीच्यावेळी व्याजावर आणि परिपक्व रक्कमवर पीपीएफमध्ये करात सूट मिळते. कोणतीही व्यक्ती पीपीएफ अकाऊंट सुरू करू शकतं आणि त्यात पैसे साठवून टॅक्स वाचवू शकतो.

VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी

First published: December 11, 2018, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading