Air India च्या विक्रीच्या हालचालींना वेग; सरकार उपकंपन्याही विकण्याच्या विचारात

Air India च्या विक्रीच्या हालचालींना वेग; सरकार उपकंपन्याही विकण्याच्या विचारात

केंद्र सरकारने (Central Government) एअर इंडियाच्या (Air india) विक्रीसाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत. यासाठी सरकारने एक निवेदन जारी केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल: केंद्र सरकारने (Central Government) एअर इंडियाच्या (Air india) विक्रीसाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत. यासाठी सरकारने एक निवेदन जारी केलं आहे. एअर इंडिया विक्रीसाठी शेअर खरेदी करार (SPA) इच्छुक संस्थांशी शेअर करण्यात येणार असल्याची माहिती सीएनबीसी-टीव्ही 18 ने सूत्रांच्या हवाले दिली आहे. त्याचबरोबर सूत्रांनी हेही सांगितलं की, एअर इंडियाच्या खरेदीमध्ये रस असणार्‍या कंपन्यांना व्हर्च्युअल डेटा रूमचा अॅक्सेस देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एअर इंडिया कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. त्यामुळे सरकार ही विमान कंपनी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे.

जुलैच्या सुरुवातीपर्यंत वेळ

एका रिपोर्टनुसार, एअर इंडियाच्या खरेदीसाठी निवडलेल्या संस्थांना आर्थिक निविदा देण्यासाठी जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंतची मुदत दिली जाऊ शकते. त्याचबरोबर बोली बंद झाल्यानंतर, पुढील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत एअर इंडियाच्या खरेदीच्या आर्थिक प्रस्तावाचं मूल्यांकन केलं जाऊ शकतं. त्यामुळे एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सप्टेंबरनंतर पूर्ण होणं अपेक्षित आहे.

एअर इंडियाच्या उपकंपन्या विक्रीचाही प्रस्ताव

एअर इंडियाच्या व्यावसायिक संचालिक मीनाक्षी मल्लिक यांनी आपल्या नेतृत्वात एका टीमद्वारे एअर इंडिया खरेदी करण्याबाबत बोली लावली होती. पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. पण सरकार केवळ एअर इंडियाच नव्हे, तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे 50 टक्के भाग विक्री करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

हे ही वाचा-Bank Privatisation: 5 सरकारी बँका शॉर्टलिस्ट, दोन बँकाच्या खाजगीकरणाविषयी 14 एप्रिलला होणार निर्णय

कंपनीवर 60,000 कोटी रुपयांचे थकित कर्ज

एअर इंडियामधील 100 टक्के भागभांडवल विक्री करणार असल्याचं सरकारने याआधीच स्पष्ट केलं आहे. या कंपनीवर आतापर्यंत 60,000 कोटी रुपयांचं थकित कर्ज आहे. 2007 साली एअर इंडियामध्ये इंडियन एअरलाईन्सचं विलीनीकरण  झाल्यापासून ही कंपनी तोट्यात आली आहे. तेव्हापासून या विमान कंपनीला उभारी घेता आली नाही.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 4:50 PM IST

ताज्या बातम्या