सरकारकडून घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय; जाणून घ्या इन्कम टॅक्समध्ये कशी मिळवाल सूट

सरकारकडून घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय; जाणून घ्या इन्कम टॅक्समध्ये कशी मिळवाल सूट

सरकारच्या या घोषणेमुळे रेसिडेन्शिअल रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळणार असून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या या योजनेचा कशाप्रकारे फायदा घेऊ शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : केंद्र सरकारने नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने नवीन घर खरेदीवरील सर्कल रेटवर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. सरकारने सर्कल रेटवरील सूट 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा करताना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमत असलेली घरं सर्कल रेटपेक्षा कमी किमतीत विकल्यास आयकरामध्ये सूट मिळणार असल्याचं, सांगितलं. सरकारच्या या घोषणेमुळे रेसिडेन्शिअल रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळणार असून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या या योजनेचा कशाप्रकारे फायदा घेऊ शकता.

विक्रेता आणि खरेदीदारांसाठी आयकरात सूट मिळवण्यासाठी आहेत नवीन नियम -

- तुम्ही विकत घेत असलेलं घर किंवा फ्लॅट नवीन असावा, रिसेलच्या फ्लॅटवर ही सूट मिळणार नाही.

- घराची किंमत 2 कोटी रुपयांहून कमी असावी.

- या सुविधेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेऊ शकता.

(वाचा - तुमच्या कारचा इन्शोरन्स संपलाय का? लगेचच करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड)

काय आहेत फायदे -

- सेक्शन 43C आणि 50C अंतर्गत खरेदीदार आणि विक्रेता दोघानांही टॅक्स भरावा लागत होता.

- स्टॅम्प ड्युटी आणि अग्रीमेंट व्हॅल्यूवर 10% हुन अधिक रकमेवर LTCG टॅक्स भरावा लागत होता.

(वाचा - PHOTO: कोरोना काळात पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा नेमकं कसं काम करतं)

आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0 अंतर्गत केली होती घोषणा -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0 अंतर्गत याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 2,65,080 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. याचबरोबर उदयोगांबरोबर शेतमजूर, मजूर, शेतकरी आणि मध्यमवर्गाला देखील दिलासा दिला होता. त्याशिवाय घर खरेदीदार आणि विक्रेता दोघानांही आयकरातून सूट मिळणार आहे. सर्कल रेट आणि ऍग्रीमेंट व्हॅल्यूमध्ये फरक 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

(वाचा - तुम्ही घातलेल्या मास्कमुळे होऊ शकतं त्वचेचं संक्रमण; कसा कराल Skin Allergy पासून बचाव)

दिवाळी गिफ्टवर असा लागणार जीएसटी-

जर तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचं बास्केट बनवून एखादी भेट दिली, तर जीएसटी लागू असलेल्या वस्तू एकत्र करून दिल्यामुळे पॅकेजिंगवर जीएसटी लागू होईल. तर बास्केटमध्ये ज्या वस्तूवर सर्वाधिक जीएसटी लागणार आहे त्यानुसार हा जीएसटी संपूर्ण बास्केटवर आकारला जाईल. त्यामुळे ज्या वस्तूंवर जीएसटी नाही त्यावरदेखील जीएसटी भरावा लागणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 17, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading