Home /News /money /

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! 32,400 रुपयांची वेतनवाढ होणार

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! 32,400 रुपयांची वेतनवाढ होणार

महागाई भत्त्याची वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकार 26 जूनला डीएमध्ये वाढ करण्याबाबत बैठक घेणार आहे.

    नवी दिल्ली, 17 जून - महागाई भत्त्याची वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी (Central Govt employee) खूशखबर आहे. केंद्र सरकार (Central Govt) 26 जूनला डीएमध्ये वाढ करण्याबाबत (Dearness allowance) बैठक घेणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत (Salary hike) जवळपास 32400 रुपयांची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डीएची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये लवकरच सरकारकडून हे पैसे ट्रान्सफर केले जातील. ही वेतनवाढ सातव्या वेतन आयोगातील (7th Pay Commission) नियमांनुसार होणार आहे. 1 जुलैनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांहून वाढून 28 टक्के होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा महागाई भत्ता मिळेल. केंद्र सरकार गेल्या वर्षी थांबवलेल्या DAचे 3 हप्ते कर्मचाऱ्यांना देणार आहे. चला जाणून घेऊया या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 32,400 रुपयांची वाढ कशी होणार आहे ते. 18 महिन्यांनी होणार वाढ - तब्बल 18 महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होणार आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे सरकराने कर्मचाऱ्यांचे भत्ते स्थगित केले होते. जानेवारी 2020 मध्ये डीएमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली गेली होती. त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जून 2020मध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यात 4 टक्क्यांची वाढ झाली. म्हणजेच एकूण डीए 28 टक्के झाला आहे. किती वाढणार सॅलरी - पगारवाढीबद्दल बोलायचं झाल्यास पे-मॅट्रिक्स नुसार, कमीत कमी पगार 18000 रुपये आहे. यामध्ये 15 टक्के महागाई भत्ता जोडला जाईल, अशी आशा आहे. म्हणजेच दर महिन्याला तुमचे 2700 रुपये वाढतील. म्हणजे तुमच्या पगारात वर्षाकाठी 32400 रुपयांची वाढ होईल. ही वाढ महागाई भत्त्याच्या रुपात असेल. लवकरच 32 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो महागाई महागाई भत्ता या महिन्यात महागाई भत्त्यात वाढीची घोषणा होणं अद्याप बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. असं झाल्यास 1 जुलैला तीन हप्ते दिल्यानंतर पुढच्या सहा महिन्यात वाढलेले 4 टक्के देखील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. हे ही वाचा: सोन्याच्या दागिन्यांबाबत महत्त्वाचे, या नियमानंतर तुमच्या ज्वेलरीचं काय होणार? अशाप्रकारे दोन वर्षात महागाई भत्ता वाढून 32 टक्क्यांवर पोहोचेल. केव्हा होणार बैठक?- The National Council (JCM) च्या माहितीनुसार, 26 जून 2021 रोजी अर्थ मंत्रालयातील खर्च विभाग, कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DoPT) आणि जेसीएमच्या प्रतिनिधींची अधिकृत बैठक होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचे कॅबिनेट सचिव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बैठकीच्या अजेंडाबाबत जेसीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितलं की, बैठकीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांचे 7 वा सीपीसी डीए आणि 7व्या सीपीसी डीआर लाभांवर चर्चा होईल. यापूर्वी ही बैठक 8 मे रोजी होणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. दर 6 महिन्यांनी डीए होतो रिवाइझ - केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दर 6 महिन्यांनी रिवाइझ होतो. जून 2021 मध्ये यामध्ये 3 ते 4 टक्क्यांपर्यंत वाढ पहायला मिळेल आणि एकूण वाढ ही 32 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या कर्मचारी आणि पेंशनधारकांना वेगवेगळा डीए दिला जात आहे.
    Published by:Prem Indorkar
    First published:

    Tags: Central government

    पुढील बातम्या