कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! दसरा-दिवाळीपूर्वी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! दसरा-दिवाळीपूर्वी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारताने 32.8 कोटी डॉलर किंमतीच्या कांद्याची निर्यात केली होती. एप्रिल-जुलैदरम्यान बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात 158 टक्के वाढली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली.
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर (Ban on Onion Export) जवळपास एक महिन्यानंतर केंद्र सरकारने यात काहीशी शिथिलता दिली आहे. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, कांद्याची निर्यात काहीशी शिथिल केली जात आहे, जेणेकरुन बेंगळुरु आणि कृष्णपूरममध्ये उत्पादन होणाऱ्या कांदा 10 हजार मॅट्रिक टनपर्यंत निर्यात केला जाऊ शकेल. याची त्वरित अंमलबजावणीही करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने, नाशिकमधून कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिलेली नाही.
चेन्नई बंदरातून होणार निर्यात
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत कांद्याची निर्यात केवळ चेन्नई पोर्टहूनच केली जाणार आहे. त्यासाठी निर्यातदारांना कांदा निर्यात करण्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हॉर्टिकल्चर विभागातून प्रमाणपत्र घ्यावं लागेल. तसंच निर्यातदारांना लोकल DGFT कार्यालयातही रजिस्ट्रेशन करावं लागेल, जेथून निर्यातीवर लक्ष ठेवलं जाईल.
आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारताने 32.8 कोटी डॉलर किंमतीच्या कांद्याची निर्यात केली होती. एप्रिल-जुलैदरम्यान बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात 158 टक्के वाढली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह बांगलादेश आणि नेपाळनेही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता. कांद्यासाठी हे दोन्ही देश भारतावर अवलंबून आहेत.
गेल्या वर्षी 29 सप्टेंबर रोजी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये निवडणूकांच्या अगदी आधीच कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. बंदीनंतर 5 महिन्यांनी सरकारने निर्यातीला मंजुरी दिली होती. 15 मार्चपासून सुरू झालेल्या निर्यातीदरम्यान, देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक कमी झाली होती. दरम्यान, या वर्षी काही राज्यात मुसळधार पावसामुळे तसंच पुरामुळे कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.