नवी दिल्ली, 18 जानेवारी : परदेशातील काळा पैसा (Black money), बेनामी मालमत्ता बाळगणारे आणि टॅक्स चोरी (Tax) करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारने यापूर्वी मोठी कारवाई केली आहे. काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांविरोधात आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आता तुम्हीदेखील तक्रार दाखल करू शकता. तुमच्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर, सरकारकडून नेमकी काय कारवाई करण्यात येत आहे, हे आता पाहता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने (Central government ) ई-फायलिंग पोर्टल सुरू केलं आहे. एका खास नंबरच्या मदतीने, तुम्ही केलेल्या तक्रारीचं स्टेटस पाहता येणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या लिंकवर जावून https://www.incometaxindiaefiling.gov.in/ अघोषित परदेशी संपत्ती/बेनामी संपत्तीच्या, 'तक्रार दाखल करा' या पर्यायावर जावं लागेल. तुमच्या पॅन कार्डचे डिटेल्स देऊन, येथे अशा प्रकरणांची तक्रार दाखल करू शकतात. जर पॅन कार्ड नसेल, तर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीही देऊ शकतात. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर आलेल्या ओटीपीच्या मदतीने तुमची तक्रार दाखल होईल आणि तुम्हाला एक नंबर दिला जाईल.
या नंबरच्या मदतीने, तुम्ही कधीही या पोर्टलवर जाऊन, तुमच्या तक्रारीवर सरकार काय कारवाई करत आहे, हे पाहता येणार आहे. तसंच कारवाई कोणत्या स्तरावर पोहचली आहे, हेदेखील पाहता येणार आहे. काळा पैसा कर अधिनियम 1961 आणि बेनामी व्यवहार संशोधन अधिनियमअंतर्गत, तक्रार दाखल करता येऊ शकते. केंद्र सरकारच्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटने हे पोर्टल तयार केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax