• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • वृद्धापकाळातही करा चांगली कमाई, जाणून घ्या मोदी सरकारच्या या योजनांबद्दल

वृद्धापकाळातही करा चांगली कमाई, जाणून घ्या मोदी सरकारच्या या योजनांबद्दल

शेतकरी (Farmers), छोटे व्यापारी (Small Businessmen), असंघटीत क्षेत्रातील कामगार, अत्यल्प उत्पन्न गटातील लोक अशा प्रत्येक घटकाचा विचार करून सरकारकडून या योजना राबवल्या जात आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं देशातील निवृत्तीवेतनाची (Pension) तरतूद नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) वृद्धापकाळी निश्चिंतपणे जगण्यासाठी दरमहा उत्पन्नाची हमी देणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतकरी (Farmers), छोटे व्यापारी (Small Businessmen), असंघटीत क्षेत्रातील कामगार, अत्यल्प उत्पन्न गटातील लोक अशा प्रत्येक घटकाचा विचार करून या वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळी कोणतीही चिंता न करता आपला उदरनिर्वाह करता येतो. अटल पेन्शन योजना (APY Atal Pension Scheme) अटल निवृत्तीवेतन योजना ही 60 वर्षांनंतर निवृत्त नागरिकांना पुढील आयुष्यात दरमहा उत्पन्न देणारी योजना आहे. 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान वय असणारा कोणीही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो. किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याद्वारे वयाच्या 60 व्या वर्षानंतर किमान एक हजार रुपये किंवा कमाल 5000 रुपये निवृत्तीवेतन मिळू शकते. पंतप्रधान श्रमिक मानधन योजना (PM Shramyogi Mandhan Scheme) असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीवेतन मिळावं या उद्देशानं सरकारनं 2019 मध्ये ही योजना दाखल केली. या योजनेमध्ये वयाच्या 60 वर्षांनतर दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं. वर्षभरात साधारण 36 हजार रुपये मिळतात. श्रम आणि कामगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 43.7 लाख लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजना (PM Kisan Mandhan Scheme) देशातील शेतकऱ्यांनाही निवृत्तीवेतन मिळावं यासाठी सरकारनं ही योजना राबवली असून आतापर्यंत 20 लाख शेतकऱ्यांनी यात नोंदणी केली आहे. 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी नावनोंदणी करू शकतो. त्याला वयाच्या 60 व्या वर्षांनतर दरमहा 3 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळतं. पंतप्रधान लघु व्यापारी मानधन योजना (Small Businessmen Pension Scheme) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2019 ला झारखंडमध्ये ही योजना दाखल केली. छोटे उद्योग करणाऱ्या अल्प उत्पन्न असणाऱ्या व्यावसायिकांना निवृत्ती वेतनाचा आधार मिळावा या हेतूनं ही योजना सुरू करण्यात आली असून, याद्वारे पात्र व्यक्तींना वयाच्या 60 व्या वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळतं. (हे वाचा-Gold Price Today: सोन्याचे दर 800 रुपयांनी घसरले, काय आहे मुंबई-पुण्यातील भाव) सरकारनं सुरू केलेल्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन नावनोंदणी करता येते. निवृत्तीवेतन योजनांमध्ये सरकारतर्फे लोकांच्या गुंतवणूकीइतकीच गुंतवणूक केली जाते. या योजनांसाठीचे नियम अतिशय सोपे असून आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक वगळता अन्य कोणत्याही कागदपत्रांची गरज यासाठी लागत नाही.
First published: