मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart वर आवश्यक कारवाई करण्यासाठी सक्तवसुली संचलनालय (ED) आणि आरबीआय (RBI) ला निर्देश दिले आहेत. या दोन्ही कंपन्यांवर एफडीआय नीती (FDI Policy) आणि फेमा नियमांचे (FEMA Act.) उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 01 जानेवारी: केंद्र सरकारने अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि वॉलमार्ट (Walmart) च्या फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स कंपन्यांवर आवश्यक कारवाई करण्यासाठी सक्तवसुली संचलनालय (ED) आणि आरबीआय (RBI) ला निर्देश दिले आहेत. या दोन्ही कंपन्यांवर एफडीआय नीती (FDI Policy) आणि परकीय चलन विनिमय कायद्याच्या नियमांचे (FEMA Act.) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) दीर्घकाळापासून या कंपन्यांवर कारवाईची मागणी करत आहे. या मागणीच्या आधारे शासनाने ही कठोर दखल घेतल्याचे समोर येते आहे. केंद्राने CAIT च्या तक्रारींच्या आधारे उचलले पाऊल कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या हवाल्याने एका मीडिया अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे CAIT ने केलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. (हे वाचा: FD काढायचा विचार करताय? तपासा या टॉप 5 बँका किती व्याजदर देत आहेत) कॅटच्या 4 तक्रारींवर केंद्राचे लक्ष उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने (DPIIT) डिसेंबरमध्ये जारी केलेल्या आपल्या पत्रात एनफोर्समेंट डायरेक्टरेट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोघांनाही या ई-कॉमर्स कंपन्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत म्हटले आहे. त्यात असे म्हटले आहे की, ईडी आणि आरबीआयला दिलेल्या निर्देशांनुसार डीपीआयआयटीने कॅटच्या 4 तक्रारी समोर ठेवल्या आहेत. (हे वाचा: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी! कामाचे तास आठच राहण्याची शक्यता- अहवाल) CAIT चा असा आरोप आहे की, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी परकीय गुंतवणूक धोरणांचे गंभीर उल्लंघन केले आहे. तसेच या कंपन्यांनी फेमाच्या नियमांचेही उल्लंघन केले आहे. फ्लिपकार्ट आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांच्यात झालेल्या करारात थेट विदेशी गुंतवणूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे भारतीया म्हणाले. कॅटचे असे म्हणणे आहे की, पुढच्या वर्षी देशभरातील व्यापारी ई-कॉमर्सविरूद्ध व्यापार सन्मान वर्ष साजरे करतील.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amazon, Flipkart

    पुढील बातम्या