नवी दिल्ली, 13 जानेवारी : जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती किंवा कंपनीचं काळ धन, अवैध किंवा बेहिशेबी संपत्ती (Benami Properties) किंवा कर चुकवेगिरीबाबत (tax evasion) माहिती असेल तर याची तक्रार सरकारकडे करा. या बदल्यात सरकार तुम्हाला 5 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस देणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तर अगदी घरबसल्या तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.
Taking another major initiative in the area of e-governance, CBDT launches dedicated e-portal on https://t.co/EGL31K6szN for filing complaints regarding tax evasion/Benami Properties/Foreign Undisclosed Assets.
Income tax Act 1961, Black Money (Undisclosed Foreign Assets and Income) Imposition of Tax Act 1961 आणि Prevention of Benami Transactions Act (as amended) या तीन कायद्याचं उल्लंघन झाल्याची तुम्ही तक्रार नोंदवू शकतात.
तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड नंबर असो किंवा नसो तुम्ही इथं तक्रार करू शकता. ही प्रक्रिया ओटीपीवर आधारित आहे. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल. त्यामुळे तुम्ही केलेल्या तक्रारीचं पुढे काय झालं ते तुम्ही पाहू शकता, त्याची माहिती तुम्हाला मिळत राहिल.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार सध्याच्या योजनेनुसार बेहिशेबी संपत्तीची माहिती देणाऱ्या एक कोटी रुपये आणि परदेशात काळं धन तसंच करचुकवेगिरीची तक्रार देणाऱ्याला काही अटींसह पाच कोटी रुपयांपर्यंत बक्षीस दिलं जातं.