मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दिवाळीनंतर काजू-बदामच्या किंमती कमी होण्याची शक्यता; हे आहे कारण

दिवाळीनंतर काजू-बदामच्या किंमती कमी होण्याची शक्यता; हे आहे कारण

ड्रायफ्रूट्स-सुवामेका अति- गरजेच्या वस्तूंमध्ये नसल्याने याच्या खरेदीवर, किंमतीवर मोठा परिणाम झाला आहे. व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षात 50 टक्केही सुक्यामेव्याची विक्री झालेली नाही.

ड्रायफ्रूट्स-सुवामेका अति- गरजेच्या वस्तूंमध्ये नसल्याने याच्या खरेदीवर, किंमतीवर मोठा परिणाम झाला आहे. व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षात 50 टक्केही सुक्यामेव्याची विक्री झालेली नाही.

ड्रायफ्रूट्स-सुवामेका अति- गरजेच्या वस्तूंमध्ये नसल्याने याच्या खरेदीवर, किंमतीवर मोठा परिणाम झाला आहे. व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षात 50 टक्केही सुक्यामेव्याची विक्री झालेली नाही.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : थंडीच्या दिवसात मोठी मागणी असलेल्या आणि दिवाळीमध्ये गिफ्ट दिल्या जाणाऱ्या सुकामेव्याच्या बाजारात ऑक्टोबर महिन्यात मोठी तेजी असते. मात्र यंदा कित्येक वर्षांनंतर या हंगामात सुकामेव्याचे दर घसरले आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून बाजारात परिस्थिती ढासळलेली आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2020 पर्यंत दुकानांत, गोदामांत भरलेला माल तसाच पडून राहिला. ड्रायफ्रूट्स-सुवामेका अति- गरजेच्या वस्तूंमध्ये नसल्याने याच्या खरेदीवर, किंमतीवर मोठा परिणाम झाला आहे. व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षात 50 टक्केही सुक्यामेव्याची विक्री झालेली नाही. आता हॉटेल, लग्न-समारंभाकडे दुकानदारांच्या नजरा आहेत.

दिल्लीतील सुवामेवा व्यापारी यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं की, कोरोना, लॉकडाऊनमध्ये सामानाची विक्री झाली नाही, दरवर्षी आतापर्यंत कमीत-कमी 50 टक्क्यांहून अधिक माल विकला जातो. या परिस्थितीत लग्न-समारंभ अतिशय कमी झाले, हॉटेल बंद होते, तसंच कोणत्याही सणाचा फायदा या बाजाराला झाला नाही. आता केवळ दिवाळी आणि हॉटेल-रेस्टोरेंटकडून खरेदीची आशा असल्याचं ते म्हणाले.

लग्नात आधीप्रमाणे, लोकांना परवानगी नसल्याने मोठ्या प्रमाणात सुवामेवा विक्री होणार नाही. तसंच हॉटेलमध्येही लोकांची संख्या कमी आहे, त्यामुळे केवळ 20 टक्केच माल हॉटेलमध्ये सप्लाय होत असल्याचं, व्यापाऱ्यांनी सांगितलं.

व्यापाऱ्यांची मागणी -

दिल्लीतील सुकामेव्याचे घाऊक आणि किरकोळ व्यापारी मौहम्मह आजम यांनी, सरकारने लग्नात अधिक लोकांना परवानगी द्यावी, त्याशिवाय हॉटेलही पहिल्याप्रमाणे पूर्ण संख्येने चालवण्याची परवानगी द्यावी असं, न्यूज 18शी बोलताना सांगितलं. असं न झाल्यास गोदामातील आधीचा माल तसाच पडून आहे, नवीन माल येण्यास सुरू झाला आहे, मात्र माल विकला न गेल्यास, व्यापारी रेट डाऊन करतील. त्याशिवाय जुना मालही काही काळापुरताच ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे तो मालही कमी किंमतीत विकावा लागले.

काजू-बदाम किंमतीत घसरण -

- अमेरिकन बदाम 900 ते 660 किलोवरुन, आता 540 ते 580 किलोने विकला जात आहे.

- काजू 1100 ते 950 रुपये किलोवरुन, 660 ते 710 रुपये किलो झाला आहे.

- 400 ते 350 रुपयेवाला किसमिस 225 ते 250 रुपये किलोने विक्री होत आहे.

10 दिवसांपूर्वी पिस्ता 1400 रुपये किलोवरून 1100 रुपयांवर आला आहे. थंडीच्या दिवसांत अक्रोडची मोठी मागणी असते. सध्या अक्रोड 800 ते 850 रुपये किलो आहे.

मौहम्मह आजम यांनी याबाबत न्यूज18शी बोलताना सांगितलं की, 'आम्ही 90 वर्षांपासून या व्यवसायात आहोत. परंतु बाजारातील अशाप्रकारची स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नाही. थंडीचे दिवस आणि दिवाळी पाहता बाजारात मोठी तेजी असते. त्याशिवाय लग्नसमारंभासाठी अनेक ऑर्डर येतात. परंतु यंदा सुकामेव्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसातही सुकामेव्याच्या किंमती, अशाप्रकारे कमी होत नसल्याचं' ते म्हणाले. दिवाळीत सुकामेव्याचे गिफ्ट पॅकही मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येतात, मात्र यंदा तेथेही मोठी घट झाल्याचं व्यसायिकांनी सांगितलं आहे.

First published: