Home /News /money /

CASHe तर्फे नोकरदांना तत्काळ कर्जाची सोय; 10 हजार ते 4 लाखांपर्यंतचे मिळेल कर्ज

CASHe तर्फे नोकरदांना तत्काळ कर्जाची सोय; 10 हजार ते 4 लाखांपर्यंतचे मिळेल कर्ज

कॅशईकडून सुरू करण्यात आलेली ही नवी योजना ग्राहकांच्या तत्काळ कर्ज उपलब्धतेच्या मागणीला दिलेला प्रतिसाद आहे.

    नवी दिल्ली, 12 मे: ‘कॅशई’ (CASHe) या कर्जपुरवठा (Loan Services) करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मनं आपल्या ग्राहकांसाठी तत्काळ वैयक्तिक कर्ज (Personal Credit Line Facility) पुरवण्याची सुविधा दाखल केली आहे. याद्वारे दहा हजारांपासून 4 लाखांपर्यंतचे कर्ज तत्काळ दिले जाते. पगारदार व्यक्तींसाठी, कर्जाची मुदत सोयीनुसार ठेवण्याची मुभाही कंपनीनं दिली आहे. कर्जदार ग्राहक त्यांच्या मंजूर मर्यादेत कोणत्याही वेळी कितीही कर्ज घेऊ शकतात. प्रत्येक ग्राहकाच्या पात्रतेच्या आधारे, कंपनीनं कर्जदारासाठी एक ठराविक मर्यादा निश्चित केली आहे. कर्जाची रक्कम कर्जदाराच्या बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे. परतफेडीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मुदतीच्या अनुषंगानं ग्राहकांनी घेतलेल्या रकमेवर व्याज आकारण्यात येईल. कंपनीनं ‘बाय नाउ पेलेटर’ (Buy Now Pay Later-BNPL) असा पर्याय देखील दिला आहे. त्याकरता ‘कॅशई’नं फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, नायका, मंत्रा, ग्रोफर्स, बिग बास्केट आणि उबर यासारख्या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांशी करार केला आहे. ‘बाय नाउ पेलेटर’ या सुविधेअंतर्गत आणखीही काही कंपन्यांशी करार करण्यात येणार आहे. वाचा: ऑनलाईन व्यवहारांसाठी डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? आता नव्याने करावं लागणार अ‍ॅक्टिव्हेशन ‘कॅशईकडून सुरू करण्यात आलेली ही नवी योजना ग्राहकांच्या तत्काळ कर्ज उपलब्धतेच्या मागणीला दिलेला प्रतिसाद आहे. ‘बाय नाउ पेलेटर’च्या (बीएनपीएल) माध्यमातून कंपनीनं ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी कधीही कर्ज उपलब्ध करुन देण्याची त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यात आली आहे,’ असं कंपनीनं म्हटलं आहे. ‘कॅशईची सुरुवात झाल्यापासून, ग्राहकांच्या अपेक्षा, मागण्या आणि बदलत्या गरजा ओळखून त्यापूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. क्रेडीट लाइन फॅसिलिटी म्हणजे तत्काळ कर्ज सुविधाही त्यातील एक महत्त्वाची सेवा आहे,’ असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगी सदाना यांनी सांगितलं. वाचा: या बँक ग्राहकांसाठी खूशखबर! WhatsApp वरच मिळतील महत्त्वाच्या सुविधा, बँकेने विविध सेवांसाठी जारी केले हे क्रमांक ‘ग्राहकांना तत्काळ कर्ज देऊन त्यांची रोख रकमेची अडचण तातडीनं सोडवण्याच्या उद्देशानं ही नवी सुविधा डिझाइन करण्यात आली आहे. एखाद्या वित्तीय सेवा कंपनीकडून अपेक्षित सर्व वैशिष्ट्यांसह आणि कार्यक्षमतेसह अतिशय अल्पावधीतही अत्याधुनिक सुविधा आमच्या कंपनीच्या इंजिनीअरिंग आणि डेव्हलपमेंट विभागानं निर्माण केली आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे,’ असंही सदाना यांनी नमूद केलं. ‘कॅशई’ ही भारताची झपाट्यानं विकसित होणारी अ‍ॅपद्वारे सेवादेणारी कंपनी आहे. ती तरूण व्यावसायिकांना तातडीनं अल्प-मुदतीचा कर्ज पुरवठा करते. गेल्या वर्षभरात कंपनीनं आपला रिटेल क्षेत्रातील कर्ज पुरवठा व्यवसाय वाढवला आहे. ‘‘सोशल लोन कोशंट’च्या सहाय्यानं कंपनीनं आर्थिक समावेशनात (Financial Inclusion) प्रगती करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, देशातील प्रत्येक गरजूला कर्ज सुविधा पुरवण्यासाठी कंपनी सातत्यानं प्रयत्न करेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Instant loans, Loan

    पुढील बातम्या