कार खरेदी करताय? मग सरकारनं बदललेले हे नियम पाहाच

कार खरेदी करताय? मग सरकारनं बदललेले हे नियम पाहाच

RTO, Cars - तुम्ही कार खरेदी करणार असाल तर सरकारनं कार खरेदीचे बदललेले नियम वाचा

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : कार किंवा स्कुटर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. तुम्ही आता तुमच्या गाडीचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता. याचा फायदा असा होईल की, आता डिलर्स आणि मोठे अधिकारी यांची दखलअंदाजी जवळजवळ कमी होईल. तसंच, लोकांचे पैसेही वाचतील. डिलर्स रजिस्ट्रेशनसाठी जास्त पैसे चार्ज करत होते.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं की, नवी कार खरेदी केली की तिच्या रजिस्ट्रेशनसाठी आरटीओमध्ये घेऊन जावं लागतं. त्यात आता थोडा बदल केलाय. रजिस्ट्रेशन अथाॅरिटी राज्य सरकारची असेल, जी आरटीओ आहे. पण ग्राहक कारचं रजिस्ट्रेशन ऑनलाइन करू शकतात. त्यांना गाडी घेऊन आरटीओमध्ये जायची गरज नाही. ते ऑनलाइन करता येईल. डिलर वाहन रजिस्टर्ड करायला दर आकारतो, ती फी आता द्यावी लागणार नाही.

चेक पेमेंट करताय? मग ही चूक करू नका, नाही तर जाल तुरुंगात

20 रुपयात उघडा Post Office मध्ये खातं आणि मिळवा मोफत 'या' सुविधा

दोन वर्षांपूर्वी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे (MORTH)नं एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यात रजिस्टर्ड डिलर्सना आरटीओसंबंधी काही कामं करण्याची परवानगी दिली होती. आरटीओवरचा भार कमी करण्यासाठी हे केलं होतं. शिवाय भ्रष्टाचार कमी होईल, ग्राहकांना कमी पैसे खर्च करावे लागतील. देशात 1300हून जास्त आरटीओ आहेत, ते सर्व प्रकारच्या वाहनांचं रजिस्ट्रेशन करतात.

बँक ऑफ बडोदामध्ये 35 व्हेकन्सी, पगार 1 लाखापर्यंत, 'असा' करा अर्ज

राज्य सरकारनं काही वर्षांपूर्वी आरटीओ उघडले होते. पण आता ते वाढवण्याची गरज आहे. एका अहवालात हे समोर आलंय की प्रत्येक आरटीओनं गेल्या वर्षी 20 हजाराहून जास्त गाड्यांचं रजिस्ट्रेशन केलंय.

VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका

Published by: Sonali Deshpande
First published: July 31, 2019, 7:01 PM IST
Tags: RTO

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading