या खासगी बँकेतून ATM कार्डाशिवाय असे काढा पैसे

या खासगी बँकेतून ATM कार्डाशिवाय असे काढा पैसे

बँकेच्या वेबसाइटनुसार तुम्ही नेट बँकिंग पोर्टलवर लाॅगइन करा आणि कार्डलेस पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू करा.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : देशाची मोठी बँक SBIनं आपल्या योनो अॅपवरून डेबिट कार्डाशिवाय पैसे कसे काढायचे, हे सांगितलं. आता देशातली मोठी खासगी बँक ICICIनं ग्राहकांना डेबिट कार्डाशिवाय पैसे काढण्याची सुविधा दिलीय. पैसे काढणाऱ्या व्यक्तीचं बँक खातं असण्याची गरज नाही. ते एका SMS द्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करून ATMशिवाय कुठल्याही डेबिट कार्डानं पैसे काढू  शकतात. जाणून घेऊया पद्धत

कार्डाशिवाय पैसे काढण्याची पद्धत - ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार तुम्ही नेट बँकिंग पोर्टलवर लाॅगइन करा आणि कार्डलेस पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू करा. पोर्टल लाॅगइन करून तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये जा. ज्याला कार्डलेस पैसे काढून द्यायचे असतील, त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर टाका.

आता फंड ट्रान्सफर टॅबवर क्लिक करा आणि कार्डलेस कॅश विथड्राॅलचा पर्याय बघून नाव सिलेक्ट करा. त्यानंतर ट्रान्सफर करण्याची रक्कम टाका. तेवढे पैसे तुमच्या अकाऊंटमधून कट होतील.

आता पैसे पाठवणाऱ्याच्या मोबाइलवर ICICI बँकतर्फे SMS येईल. त्यात चार आकडी युनिक कोड येईल. ज्याला पैसे पाठवलेत त्याच्या मोबाइलवरही सहा आकडी युनिक कोड येईल. हे ट्रान्झॅक्शन आणि SMS कोड दुसऱ्या दिवशी रात्रभर सुरू राहील.

यानंतर ज्याला पैसे द्यायचेत त्यानं ATMमध्ये आपला मोबाइल नंबर, व्हेरिफिकेशन कोड, एकूण रक्कम टाकायची.

या ट्रान्झॅक्शनमध्ये एका वेळी 10 हजार रुपये, दिवसाला 20 हजार रुपये आणि महिन्याला 25 हजार रुपये करू शकता. प्रति ट्रान्झॅक्शन 25 रुपये द्यावे लागतील.

VIDEO : दोघांचं भांडणं तिसऱ्याचा राडा, टोल नाक्यावर तुफान हाणामारी

First published: April 15, 2019, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading