Home /News /money /

व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, कार्ड टोकनायझेशनबाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, कार्ड टोकनायझेशनबाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

    मुंबई, 26 जून : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) 'कार्ड-ऑन-फाइल' टोकन व्यवस्थेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. याची अंतिम मुदत आधी 30 जून 2022 होती. म्हणजेच यापूर्वी 1 जुलैपासून संपूर्ण देशात टोकन सिस्टम (Tokenization System) लागू होणार होती, मात्र आता याची मुदत वाढवण्यात आली आहे. उद्योग संस्थांकडून मिळालेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे. पूर्वी पेमेंटसाठी वापरल्या जाणार्‍या कार्डचे तपशील पेमेंट सिस्टम आणि आस्थापनेकडे सुरक्षित ठेवले गेले होते जेणेकरून भविष्यातील व्यवहारांच्या वेळी हे तपशील वापरता येतील, परंतु यामुळे कार्ड वापरकर्त्यांचे तपशील असुरक्षित हातात जाण्याची भीती होती. आता नोकरी मागू नका तर द्या! छोट्या जागेत सुरू करा साबणाचा व्यवसाय, महिन्याला होईल बंपर कमाई अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी आणि हा डेटा असुरक्षित हातात जाण्यापासून वाचवण्यासाठीच मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आरबीआयने कार्ड-ऑन-फाइल (COF) टोकन प्रणाली लागू करण्यास सांगितले आहे. घराच्या गच्चीचा उपयोग करा बिझनेससाठी, घरबसल्या मिळवा चांगलं उत्पन्न मध्यवर्ती बँकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, या सिस्टमच्या अंमलबजावणीमध्ये काही समस्या निदर्शनास आणल्या आहेत. हे मुद्दे भागधारकांशी सल्लामसलत करून हाताळले जात आहेत आणि कार्डधारकांच्या अडचणी आणि गैरसोय टाळण्यासाठी, टोकन व्यवस्थेची अंतिम मुदत 30 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काय आहे टोकनायझेशन सिस्टम? टोकनायझेशन सिस्टममुळे प्रत्येक वेळी आपल्या डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी नव्याने डिटेल्स टाकावे लागणार आहेत. या आधी ग्राहकांचे क्रेडिट, डेबिट कार्ड डिटेल्स मर्चंट आमि पेमेंट गेटवेला आपल्या सर्व्हरवर स्टोर करण्यात येत होते. यापुढे हे डिटेल्स पेमेंट गेटवेला जमा करता येणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावेळी ग्राहकाला नवा तपशील द्यावा लागणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Credit card, Money, Rbi

    पुढील बातम्या