Home /News /money /

Google Pay वरून आता कार्ड पेमेंटसुद्धा शक्य; काय आणि कशी वापरायची सुविधा?

Google Pay वरून आता कार्ड पेमेंटसुद्धा शक्य; काय आणि कशी वापरायची सुविधा?

गेल्या वर्षी Google For India या कार्यक्रमात भारतात कार्डवरून पेमेंटच्या योजनेची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात आली आहे. ही अधिक सुरक्षित सेवा आहे. कसं वापरता येईल Google वरून SBI कार्ड?

    मुंबई, 24 सप्टेंबर : डिजिटल पेमेंटमध्ये (Digital Payment) प्रचलित असलेल्या Google Pay ने पूर्ण् डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला आहे. गूगल पेवरून आता कार्ड पेमेंटची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर Google Pay ने नुकतंच Axis bank आणि स्टेट बँक कार्ड्स (SBI cards) या दोन महत्त्वाच्या  कार्ड नेटवर्कशी सहकार्य करार केले आहेत. म्हणजे या दोन बँकांच्या डेबिट कार्डवरून गुगल पे करता येईल. कशी वापरायची ही सुविधा? किती सुरक्षित आहे? क्रेडिड कार्ड क्षेत्रात स्टेट बँकेचं मोठं नाव भारतात आहे.अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक या दोन्ही बँकांची कार्ड्स Google Payच्या टोकनायझेशन या नव्या संकल्पनेला धरून काम करणार आहेत. ही पद्धत ग्राहक, व्यापारी यांना  ऑनलाइन-ऑफलाइन व्यवहार अधिक सुरक्षितपणे करण्यास प्रोत्साहन देईल, असा विश्वास Google Pay आणि NBU प्रमुख साजित शिवानंदन यांनी व्यक्त केला. कसं होणार कार्ड पेमेंट? Google ने सप्टेंबर 2019 मध्‍ये आपल्या Google For India या कार्यक्रमात भारतात कार्डवरून पेमेंटच्या योजनेची घोषणा केली होती. आता झालेली भागीदारी ही त्या योजनांचंच फलित असल्याचं त्यांनी सांगितलं. Google आता पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत आहे. आतापर्यंत Google Pay वापरणाऱ्यांजवळ बँक खात्याशी संबधित UPI हँडलचा उपयोगाचा पर्याय होता. मात्र, आता या सोबतच कार्ड पेमेंटचा पर्यायही उपलब्ध असेल. टोकन पद्धत नेमकी काय आहे? टोकनायझेशन ही कार्ड पेमेंटची एक नवीन पद्धत आहे. त्यामुळे या प्रकारचे व्यवहार अधिक सुरक्षित होतात. प्रत्येक कार्डधारकाची ओळख म्हणून कार्डवर 16 अंकी एक क्रमांक दिला असतो. व्हिसा कार्ड या अंकांना रँडम नंबरमध्‍ये बदलतं आणि त्यांना सेव्ह करतं. जेव्हा ग्राहक त्या कार्डचा उपयोग करतील तेव्हा व्हिसा कार्ड नंबरऐवजी व्यापाऱ्यांसोबत टोकन नंबर शेअर करतं. यात कार्ड नंबर त्यांना कळत नाही आणि व्यवहार अगदी सुरक्षितपणे पार पडतो. अशी ही टोकन व्यवस्था असेल. केवळ ओटीपीचा वापर करून तुम्ही Google Pay मध्ये कार्डची नोंदणी करू शकता. त्यानंतर त्याला टोकन प्रकराने तुम्ही सेव्ह करू शकता. व्यवहार करताना Google Pay उघडल्यानंतर पैसे पाठवणं किंवा स्वीकारणे यासाठी कार्ड निवडा, ओटीपी आणि वॉईला च्या माध्यमातून ते प्रमाणित करा आणि झालं तुमचं पेमेंट अशी साधी सरळ व सुरक्षित ही प्रणाली आहे. शिवाय यात कार्डाचा नंबर,  सीव्हीव्ही आणि एक्स्पायरी डेट वारंवार टाकायची गरज नाही. विविध बिलं भरण्यासाठी, इ-कॉमर्स, व्यापारासाठी त्याचा वापर करता येईल. ग्राहकांना त्यांचे मोबाइल वापरून त्यात NFC - Near Field Communication हे फिचर सुरू करावं लागेल. भारतात बहुतांश स्मार्टफोनमध्ये NFC नसतं. त्यामुळे व्हिसा टोकनायझेजन ही प्रणाली अधिक वापरण्यात आली नाही. QR कोड स्कॅन करून तुम्ही कार्डवरून पेमेंट करू शकता हा Google Pay चा एक फायदा आहे. व्हिसासोबत करार झाल्यानंतर Google Pay च्या माध्यमातून प्रत्येक व्यापारी डिजिटल पेमेंटची सुविधा स्वीकारू शकेल. स्टेट बँक आणि ॲक्सिस बँकेचे कार्डधारक यांना या सेवेचा प्राथमिक स्तरावर लाभ मिळणार आहे. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. ज्यांच्याकडे भारत क्युआरकोडचं स्टीकर आहे त्या 25 लाख व्यापारी पॉइंट, 15 लाख व्यापाऱ्यांकडे पेमेंटसाठी हे सुविधा वापरता येईल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: SBI

    पुढील बातम्या