मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कारवर Loan घेतलं तर करातून सूट मिळते का? काय सांगतो नियम

कारवर Loan घेतलं तर करातून सूट मिळते का? काय सांगतो नियम

अडचणीच्या वेळी जसे घर किंवा सोने गहाण ठेवून कर्ज काढता येते तसंच कार गहाण ठेवून बँक कर्ज देते. काही अटींसह कार खरेदीसाठी कर्ज घेतल्यास करात सूट मिळते.

अडचणीच्या वेळी जसे घर किंवा सोने गहाण ठेवून कर्ज काढता येते तसंच कार गहाण ठेवून बँक कर्ज देते. काही अटींसह कार खरेदीसाठी कर्ज घेतल्यास करात सूट मिळते.

अडचणीच्या वेळी जसे घर किंवा सोने गहाण ठेवून कर्ज काढता येते तसंच कार गहाण ठेवून बँक कर्ज देते. काही अटींसह कार खरेदीसाठी कर्ज घेतल्यास करात सूट मिळते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई : वाहने ही अशी मालमत्ता आहे ज्यांची खरेदीनंतर किंमत कमी होत जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, अडचणीच्या वेळी जसे घर किंवा सोने गहाण ठेवून कर्ज काढता येते तसंच कार गहाण ठेवून बँक कर्ज देते. काही अटींसह कार खरेदीसाठी कर्ज घेतल्यास करात सूट मिळते.

कारच्या बदल्यात कर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे जिथे तुमची कार फंडसाठी एक कॉलेट्रल म्हणून उपयोगी पडते. या कर्जाची प्रक्रिया वेगवान असते तसेच गुंतागुंतीपासून मुक्त असते.

कारवर कर्ज देण्याआधी बँक अॅप्रूव्हलसाठी सर्वात आधी तुमच्या वाहनाचे मूल्यांकन केले जाईल. चोरी झालेलं वाहन किंवा ज्याच्याकडे सरकारचा परवाना नाही अशा गाडीचा कर्जासाठी विचार केला जाणार नाही. बंद पडलेल्या किंवा मॉडेलसाठी करण्यात आलेले कर्जाचे अर्जही स्वीकारले जाणार नाहीत.

हे ही वाचा : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक गिफ्ट, घरबसल्या होणार मोठा फायदा

कर्जाची रक्कम निश्चित करण्यासाठी बँक इतर निकषांवरही विचार करते. त्यामध्ये उत्पन्न, सध्याचे कर्ज आणि क्रेडिट हिस्ट्री यांचा समावेश असतो. सर्वसामान्यपणे कर्जाची रक्कम ही कारच्या किंमतीच्या ५० टक्क्यांहून अधिक असते. कर्जाची परतफेड करण्यासाठी १२ महिन्यांपासून ४८ महिन्यांपर्यंत मुदत असले. कर्जासाठी १ ते ३ टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग शुल्कही घेतले जाते. अनेक बँका ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कारवर कर्ज देते. अशा बँकांबाबत चौकशी करून तुम्ही कर्ज घेऊ शकता.

हे ही वाचा : दोन रुपये द्या अन् 5 लाख मिळवा, समजून घ्या कसं?

कारवर कर्जाच्या माध्यमातून आयकरात सूटही मिळू शकते. कर आणि गुंतवणूक सल्लागारांच्या मते यात एक महत्त्वाची अट असते. ती म्हणजे गाडीचा वापर व्यवसायाच्या कामासाठीच केला जावा. यात टॅक्सी किंवा ट्रॅव्हल एजन्सीसोबत तुम्ही भाड्याने गाडी चालवत असाल तर याचा लाभ मिळू शकतो.

वाहन कर्जावर देण्यात येणाऱ्या व्याजावरच नाही तर दर वर्षी वापरण्यात येणारे पेट्रोल, डिझेल आणि कारच्या दुरुस्तीवर खर्चाचा समावेशसुद्धा आयकरातून सूटीसाठी होऊ शकतो. कार खरेदीच्या किंमतीत वर्षाला कमी होणाऱ्या किंमतीवरही याचा लाभ घेता येऊ शकतो.

First published:

Tags: Car, Income tax, Loan