मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कार घेण्याचा विचार करताय? मग New Year आधीच घ्या, नाहीतर द्यावे लागणार जास्त पैसे

कार घेण्याचा विचार करताय? मग New Year आधीच घ्या, नाहीतर द्यावे लागणार जास्त पैसे

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, याच महिन्यात खरेदी करा अन्यथा पडू शकतं महाग

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: घरातली आर्थिक घडी मजबूत झाली, की अनेक जण कार खरेदी करण्याचा विचार करतात. आता कार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण बहुतांश कार उत्पादक कंपन्या कार्सच्या किमती वाढवणार आहेत.

मर्सिडीज-बेंझ, ऑडी, रेनॉल्ट, किया इंडिया आणि एमजी मोटर्स या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी काल, बुधवारी (7 डिसेंबर 2022) घोषणा केली, की जानेवारी 2023पासून कार्सच्या किमती वाढवण्याची तयारी त्या कंपन्या करत आहेत.

त्यामुळे कंपनीवरचा आर्थिक भार अंशतः कमी होईल. या आठवड्याच्या सुरुवातीलाच मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनीही पुढच्या महिन्यापासून कार्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. रेनॉल्टने पुढच्या महिन्यापासून किमतीमध्ये किती वाढ करण्याची योजना आखली आहे, हे उघड केलं नाही.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग धिल्लन यांनी म्हटलं आहे, की ‘पुरवठा साखळीशी संबंधित इनपुट आणि ऑपरेशन कॉस्ट वाढत असल्याचा परिणाम म्हणून किमती वाढवणं आवश्यक आहे. सतत वाढणाऱ्या महागाईच्या काळात वाढत्या खर्चाचा भार पेलणं आता कठीण होत आहे.’

तुम्हीही CNG कार वापरता? मग चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, अन्यथा...

मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं की, ‘इनपुट कॉस्टमध्ये सतत वाढ होत असल्याने किंमत वाढवण्याचा दबाव वाढत आहे.’

रेनॉल्ट इंडियाने म्हटलं आहे की, ‘मौल्यवान वस्तूंच्या चढ्या किमती, चढ-उतार होणारे परकीय चलन दर आणि चलनवाढ यामुळे इनपुट कॉस्टमध्ये सतत वाढ होत असून, त्याचा परिणाम अंशतः किमती वाढवून ग्राहकांवर टाकला जाईल.’

खर्च कमी करण्यासाठी 1 जानेवारी 2023पासून कारच्या किमती वाढवणार असल्याचं मारुती सुझुकी कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं. खर्च कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. आता भाव वाढवणं गरजेचं झालं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ह्युंदाई मोटार्स आणि होंडा कार्स यांनी मात्र अद्याप किमती वाढवण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.

कार लोन फेडल्यानंतर तातडीनं करा ‘हे’काम करा, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

ऑडी इंडिया कंपनी संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किमती 1.7 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. मर्सिडीज बेंझच्या किमती 5 टक्क्यांनी वाढणार आहेत. किया इंडिया कंपनी त्यांच्या कारच्या किमती 50 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते. एमजी मोटर कंपनी खर्च कमी करण्यासाठी किमती 2 ते 3 टक्क्यांनी वाढवू शकते.

अनेक जण नवीन कार घेतल्यानंतर सोशल मीडियावर न्यू फॅमिली मेंबर अशी कॅप्शन देऊन कारचे फोटो शेअर करून आनंद व्यक्त करतात. सामान्य माणूस त्याची आर्थिक परिस्थिती बघून कार खरेदी करतो. त्यातच आता कारच्या किमती वाढणार असल्यानं त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

First published:

Tags: Car, Money, New year