मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुम्हालाही खरेदी करायची आहे नवीकोरी कार? या बँका स्वस्तात देतायंत Car Loan; वाचा सविस्तर

तुम्हालाही खरेदी करायची आहे नवीकोरी कार? या बँका स्वस्तात देतायंत Car Loan; वाचा सविस्तर

घर खरेदीनंतर कारखरेदी हीच महागडी खरेदी आहे. त्यामुळे अनेकांना कार घेणं परवडत नाही. पण अशा वेळेस कार लोनचा म्हणजेच कारसाठी कर्जाचा (Car Loan) पर्याय समोर येतो. जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या बँका काय दराने कार लोनवर व्याज आकारत आहेत

घर खरेदीनंतर कारखरेदी हीच महागडी खरेदी आहे. त्यामुळे अनेकांना कार घेणं परवडत नाही. पण अशा वेळेस कार लोनचा म्हणजेच कारसाठी कर्जाचा (Car Loan) पर्याय समोर येतो. जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या बँका काय दराने कार लोनवर व्याज आकारत आहेत

घर खरेदीनंतर कारखरेदी हीच महागडी खरेदी आहे. त्यामुळे अनेकांना कार घेणं परवडत नाही. पण अशा वेळेस कार लोनचा म्हणजेच कारसाठी कर्जाचा (Car Loan) पर्याय समोर येतो. जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या बँका काय दराने कार लोनवर व्याज आकारत आहेत

पुढे वाचा ...

मुंबई, 19 जानेवारी: हल्लीच्या काळात स्वत: ची कार असणं ही चैनीची गोष्ट नाही तर एक अत्यावश्यक गरज बनली आहे. खरं तर घर खरेदीनंतर कारखरेदी हीच महागडी खरेदी आहे. त्यामुळे अनेकांना कार घेणं परवडत नाही. पण अशा वेळेस कार लोनचा म्हणजेच कारसाठी कर्जाचा (Car Loan) पर्याय समोर येतो. अर्थात कार लोनसाठीही सगळ्यात जास्त व्याजदराचा विचार केला जातो. काही बँका अगदी कमी व्याजदरात कार लोन उपलब्ध करुन देतात. जर तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला कर्ज हवं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण कोणती बँक सगळ्यात कमी व्याज दरात कार लोन देते हे आपण आता पाहणार आहोत. आम्ही तुम्हाला State Bank of India (SBI), ICICI Bank, HDFC Bank आणि Bank of Baroda च्या कार लोन्सबद्दल माहिती देणार आहोत.

SBI कार लोन (SBI Car Loan)

SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामधून तुम्हाला 7.25 टक्के प्रतिवर्ष व्याजदरानं कार लोन मिळू शकेल. यामध्ये अन्य काही फायदेही आहेत. ज्यात 90 टक्के ऑन रोड फायनान्स आणि झीरो पेमेंट चार्जही आहे. SBI कडून रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन फी आणि इन्शुरन्स प्रीमियम यासाठीही एकदा फायनान्स केलं जातं. तर बँक मुद्दलावर (Outstanding Amount) फ्री पर्सनल अपघात विम्याची सुविधाही देते. अपघाती मृत्यू झाल्यास कार लोनची उर्वरित रक्कम नातलगांना भरावी लागू नये यासाठी ही सुविधा आहे.

हे वाचा-Gold Price Today:सोने-चांदी खरेदीची चांगली संधी,इथे तपासा आजचा महाराष्ट्रातील दर

आयसीआयसीआय बँक (ICICI Car Loan)

ICICI बँकेकडून एका निश्चित व्याजदरासह नव्या कारसाठी लोन देण्यात येत आहे. कार लोनचा हा निश्चित व्याजदर कर्जाच्या कालावधीदरम्यान स्थिर राहील. लोनच्या व्याजाचा कालावधी आणि अन्य गोष्टींवर आधारित व्याजदर 7.50 ते 9% पर्यंत असू शकतो.बँकेच्या वेबसाईटनुसार नव्या कारवरील कर्जाचा दर ऑटोमोबाईल क्षेत्र, सिबिल स्कोअर, ग्राहकांचं संबंध, कर्जाचा अवधी इ. गोष्टींवर ठरवला जातो.

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda Car Loan)

बँक ऑफ बडोदाच्या वतीने 90 टक्क्यांपर्यंत कार लोन मिळू शकतं. त्यासाठी व्याजर 7 ते 9 टक्क्क्यांदरम्यान असू शकतो. ज्या ग्राहकांना क्रेडिट विमा कव्हरेज नको आहे त्यांना सध्याच्या नियमांनुसार 0.05 रिस्क प्रीमियम लावला जाईल.

एचडीएफसी (HDFC Car Loan)

एचडीएफसी बँकेच्या वततीने 7.25 टक्के व्याजदरानं कार लोन मिळू शकतं. अर्थात या बँकेकडून लोन घेतल्यास ते तुम्ही सहा महिन्यांच्या आत फोर्स क्लोज्ड म्हणजेच पूर्ण पैसे भरून बंद करु शकत नाही. सातव्या हप्त्याच्या (EMI) एक वर्षाच्या आत प्रीक्लोजरवर मूळ रकमेच्या 6 टक्के व्याज लावण्यात येईल.

हे वाचा-Petrol Diesel Price Today: IOCL कडून इंधर दर जारी,तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

कार लोनसाठी काय आहे पात्रता?

कार लोनसाठी तुमचं वय 21 ते 67 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. नोकरदारांसाठी कार लोनची रक्कम त्यांच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या 48 पट असेल. त्याचबरोबर लोन घेणाऱ्याचं वार्षिक उत्पन्न कमीतकमी तीन लाख रुपये आवश्यक आहे. प्रोफेशनल्स, स्वत:चा उद्योगधंदा करणारे आणि व्यावसायिकांसाठी या कर्जाची रक्कम ITR (आयटीआरनुसार) एकूण लाभ किंवा एकूण कर योग्य उत्पन्नाच्या चार पट असते. शेती आणि त्याच्याशी निगडीत उपक्रमांमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीन पट रकमेचं कर्ज मिळू शकतं. मग तुमची पात्रता तपासा आणि कोणता व्याजदर तुम्हाला योग्य वाटतो त्या बँकेत जाऊन कार कर्जासाठी अर्ज करा आणि स्वत:च्या मालकीची कार विकत घ्या.

First published:

Tags: Loan, Pay the loan