मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कॅनरा बँकेकडून Loan बाबत मोठी घोषणा; देणार सर्वात स्वस्त कर्ज, इतकं द्यावं लागणार व्याज

कॅनरा बँकेकडून Loan बाबत मोठी घोषणा; देणार सर्वात स्वस्त कर्ज, इतकं द्यावं लागणार व्याज

कॅनरा बँक (Canara bank) सर्वात स्वस्त कर्ज देत आहे. बँकेचे कर्जांसाठीचे व्याजदर सर्वात कमी असल्याचा दावा बँकेने केला आहे.

कॅनरा बँक (Canara bank) सर्वात स्वस्त कर्ज देत आहे. बँकेचे कर्जांसाठीचे व्याजदर सर्वात कमी असल्याचा दावा बँकेने केला आहे.

कॅनरा बँक (Canara bank) सर्वात स्वस्त कर्ज देत आहे. बँकेचे कर्जांसाठीचे व्याजदर सर्वात कमी असल्याचा दावा बँकेने केला आहे.

नवी दिल्ली, 9 जून : तुम्ही गाडी किंवा घर घेण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्याच्या या कोरोना काळात कॅनरा बँक (Canara bank) सर्वात स्वस्त कर्ज देत आहे. बँकेचे या कर्जांसाठीचे व्याजदर सर्वात कमी असल्याचा दावा बँकेने केला आहे. बँकेने ट्विटवरून सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत असल्याची घोषणा केली आहे. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या स्वस्त कर्जासह MCLR आणि RLLR मध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, बँकेने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, 7.35 टक्के एमसीएलआर (MCLR) आणि 6.90 टक्के आरएलएलआर (RLLR) दराने कर्ज दिलं जात आहे. 7 जून 2021 पासूनचे हे व्याजदर आहेत. याशिवाय बँकेच्या काही अटी आणि शर्ती आहेत, त्याचं पालन केल्यानंतरच तुम्हाला कर्ज दिलं जाईल.

कर्ज कसं मिळेल -

कॅनरा बँकेकडून तुम्हाला घर किंवा वाहन कर्ज घ्यायचं असेल, तर बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता. तसंच बँकेकडून https://canarabankcsis.in/canaraila/newmain.aspx ही लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही लोन सेक्शनमध्ये जाऊन तिथे उपलब्ध ऑप्शन्सपैकी तुम्हाला जे कर्ज घ्यायचं आहे, त्यावर क्लिक करून त्यासाठी अप्लाय करू शकता. तुम्ही अप्लाय केल्यानंतर बँकेचे कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधतील. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही लोनच्या इएमआयबद्दल माहिती मिळवू शकता.

(वाचा - तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा)

एमसीएलआर आणि आरएलएलआरमध्ये काय फरक आहे?

एमसीएलआर (MCLR) कमी किंवा जास्त केल्याचा परिणाम हा नवं कर्ज घेणाऱ्यांसोबतच, 2016 नंतर ज्यांनी कर्ज घेतलं होतं अशा सर्वच ग्राहकांवर पडतो. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं, तर 2016 च्या एप्रिलपूर्वी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज देण्यासाठी किमान व्याजदर ठरवून दिले जात असत, त्यांना बेस रेट म्हणत. या दरापेक्षा कमी दराने कर्ज देण्याची बँकांना परवानगी नव्हती.

(वाचा - Income tax च्या नव्या वेबसाईटमध्ये समस्या, निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया)

1 एप्रिल 2016 नंतर एमसीएलआर लागू करण्यात आला आणि हा कर्जासाठी मिनिमम रेट म्हणून नक्की करण्यात आला. त्यानंतर पुढे एमसीएलआरच्या आधारावरच कर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली.

(वाचा - APY Scheme: दररोज 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला होईल 5 हजारांची सेव्हिंग)

रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यावरुन कित्येक बँकांनी आपले गृहकर्ज हे रेपो रेटसोबत जोडले आहेत. यामुळे रेपो रेट घसरले, तर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होतो. रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात तो दर. तर आरएलएलआर (RLLR) हा एक एक्सटर्नल बेंचमार्क आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर आधारित असतो.

First published:

Tags: Home Loan, Pay the loan