मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBI ची बैठक संपण्याआधीच 'या' तीन बँकानी व्याजदर वाढवले; EMI आणखी वाढणार

RBI ची बैठक संपण्याआधीच 'या' तीन बँकानी व्याजदर वाढवले; EMI आणखी वाढणार

रिझर्व्ह बँकेच्या घोषणेआधीच बँकांनी व्याजदर आणखी वाढवण्यास सुरुवात केली आहे. आजपासून कॅनरा बँक (Canara Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि करूर वैश्य बँक (Karur Vysya Bank) या तीन बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 7 जून : स्वस्त कर्जाचे दिवस आता गेले असंच म्हणावं लागेल. कारण सर्वच बँकांना आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो (Reserve Bank of India) दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत. आता पुन्हा एकदा RBI रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या घोषणेआधीच बँकांनी व्याजदर आणखी वाढवण्यास सुरुवात केली आहे. आजपासून तीन बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनरा बँक (Canara Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि करूर वैश्य बँकेने (Karur Vysya Bank) त्यांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. कॅनरा बँकेने सांगितले की, नवे व्याजदर 7 जूनपासून लागू होणार आहेत. कॅनरा बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. करूर वैश्य बँकेने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 0.40 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. HDFC ने देखील MCLR 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेले Westin हॉटेल आहे तरी कसं? एका दिवसासाठी साधारण किती खर्च येतो? कर्ज किती महाग होणार? कॅनरा बँकेने एक वर्षाच्या कर्जासाठी MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवून 7.40 टक्के केला आहे. त्याचबरोबर हा दर 6 महिन्यांसाठी 7.30 टक्क्यांवरून 7.35 टक्के करण्यात आला आहे. खाजगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने बीपीएलआर 0.40 टक्क्यांनी वाढवून 13.75 टक्के केला आहे आणि बेसिस पॉईंट देखील 0.40 टक्क्यांनी वाढवून 8.75 टक्के केला आहे. HDFC ने MCLR देखील वाढवला HDFC बँकेने ओव्हरनाईट कर्जासाठीचा MCLR 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. एक महिन्याच्या कर्जाचा व्याजदर 7.20 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आला आहे. या वाढीनंतर, तीन आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर अनुक्रमे 7.60 टक्के, 7.70 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, एक वर्षासाठी कर्ज 7.85 टक्के दराने उपलब्ध असेल. दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या कर्जासाठी व्याजदर 7.95 टक्के आणि 8.05 टक्के झाला आहे. Tata ग्रुपच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर रेपो दर वाढू शकतो आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक संपण्यापूर्वीच बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. RBI च्या या बैठकीत रेपो दरात 35 ते 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
First published:

Tags: Hdfc bank, Loan, Rbi, Repo rate

पुढील बातम्या