मराठी बातम्या /बातम्या /मनी /पुन्हा बाजार गडगडणार का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या बातमीमुळे शेअर बाजारात भीतीचं वातावरण

पुन्हा बाजार गडगडणार का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या बातमीमुळे शेअर बाजारात भीतीचं वातावरण

Coronavirus second wave: जागतिक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सावध व्यापारामुळे दोन आठवड्यांपासून बाजार घसरताना दिसत आहे.

Coronavirus second wave: जागतिक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सावध व्यापारामुळे दोन आठवड्यांपासून बाजार घसरताना दिसत आहे.

Coronavirus second wave: जागतिक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सावध व्यापारामुळे दोन आठवड्यांपासून बाजार घसरताना दिसत आहे.

  नवी दिल्ली, 19 मार्च: भारतात पुन्हा कोरोना (Coronavirus latest updates) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दुसऱ्या लाटेची (Second Wave) शक्यता वर्तवली आहे. विशेषतः मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेची शक्यता अधिक वाटते. त्यामुळे शेअर बाजार (Stock Market) भीतीचं वातावरण आहे.

  अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बैठकीपूर्वी जागतिक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सावध व्यापारामुळे दोन आठवड्यांपासून बाजार घसरताना दिसत आहे. या अस्थिरतेमुळे सलग चौथ्या दिवशीही घसरण पाहायला मिळाली. भारतीय निर्देशांक बुधवारी नकारात्मक स्थितीत बंद झाला. त्यातच अस्थिरतेमुळे सर्व क्षेत्रांमध्ये विक्रीचा कल दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) 562.34 अंकांनी म्हणजेच 1.12 टक्क्यांनी घसरुन 49,801.62 वर बंद झाला. निफ्टी (Nifty) 189.20 म्हणजेच 1.27 टक्क्यांनी घसरुन 14,721.30 वर बंद झाला. सुमारे 2115 शेअर्स घसरले तर 138 शेअर्समध्ये (Shares) कोणताही बदल झाला नाही. निफ्टी पीएसयू बॅंक निर्देशांक 4 टक्क्यांनी घसरल्याने सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेडमध्ये संपुष्टात आले.

  Nomura शी संबंधित अर्थशास्त्रांच्या मते, कोविड-19 च्या भारतातील संभाव्य दुसऱ्या लाटेची चिंता आणि बाजारात अपेक्षित स्थिती यायला विलंब होऊ शकतो तथापि, आम्हाला अत्यल्प नकारात्मक वाढीची अपेक्षा आहे. कारण सरकार कडक निर्बंध शिथील करत आहे, तसेच वस्तू क्षेत्रातील (Goods Sector) घडामोडी संथ आहेत, तसेच घरगुती आणि व्यवसाय न्यू नॉर्मलच्या अनुषंगाने होत असलेल्या बदलांशी जुळवून घेताना दिसत आहे, अशी माहिती नोमुराचे अर्थशास्त्रज्ञ सोनल वर्मा आणि ऑरदीप नंदी यांनी दिली.

  पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त ? किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

  जेव्हा कोरोनाच्या पहिला लाटेच्या फटका बसला तेव्हा भारतीय बाजारपेठांची स्थिती कशी होती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जूनच्या तिमाहीत 2.08 दशलक्ष डॉलर्सची केवळ चार पब्लिक ऑफरिंग्ज झाल्याचं आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म ईवायच्या एका अहवालात म्हटलं आहे. यावेळी सर्व आयपीओ लघु व मध्यम उद्योग (SME) विभागात होते. त्यांची देवाण घेवाणीची व्याप्ती 0.38 दशलक्ष डॉलर होती. ईवाय इंडियाचे पार्टनर आणि अर्थिक सल्लागार संदीप खेतान म्हणाले, की गेल्या तीन महिन्यांमधील अनुभव अभूतपूर्व असाच होता. एसएमई मार्केटमध्ये Q2 2019 आणि Q1 2020मध्ये अनुक्रमे 14 आणि 11 च्या विरुध्द 4 आयपीओ होते.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी बोलताना म्हणाले, की देशभरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता त्यावर मर्यादा घालणे आणि मायक्रो कन्टेंमेंट झोन (Micro Contenment Zone) तयार करणे आवश्यक आहे. यामुळेच आपण कोरोनाच्या येत्या दुसऱ्या लाटेला थोपवून धरु शकू.

  मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की जर आपण ही महामारी आत्ताच रोखू शकलो नाही तर ती देशभरात गंभीर रुप धारण करेल. ही दुसरी लाट आपल्याला थोपवायची असेल तर मोठी आणि निर्णायक पावले उचलावी लागतील.

  First published:

  Tags: Corona spread, Coronavirus, Covid-19, Money, Share market, Vaccination