नागरिकत्व सुधारणा कायद्याचा तुमच्या जेवणावर होणार थेट परिणाम, वाचा नेमका कसा?

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा तुमच्या जेवणावर होणार थेट परिणाम, वाचा नेमका कसा?

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि तुमच्या जेवणाचा संबंध काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या मुद्द्यावरून भारत आणि मलेशियामध्ये तणाव निर्माण झाल्याने त्याचा परिणाम खाद्यतेलावर होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि तुमच्या जेवणाचा संबंध काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या मुद्द्यावरून भारत आणि मलेशियामध्ये तणाव निर्माण झाल्याने त्याचा परिणाम खाद्यतेलावर होणार आहे. कांद्यानंतर आता तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. मागच्या एक वर्षात तेलाचे भाव 8 टक्क्यांपासून ते 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. CNBC आवाज च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने पामतेलावरचा कर कमी करण्याची तयारी केली होती. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी NRC बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता हे थंड बस्त्यात जाण्याची शक्यता आहे. या स्थितीत खाद्यतेलाचे दर आणखी वाढू शकतात. यामध्ये पामतेलाचे भाव सगळ्यात जास्त वाढलेत.

मलेशियाने वाढवला कर

मलेशियामध्ये यावर्षी पामतेलाचं उत्पादन कमी झालं आहे. त्यामुळे मलेशियाच्या सरकारने पामतेलावर निर्यात कर लावला आहे. याचा परिणाम भारतातल्या बाजारावर झालाय.

भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनं सुरू आहेत. मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी भारतावर टीका केली आहे. भारतात जर 70 वर्षांपासून लोक राहत आलेत मग या कायद्याची आवश्यकताच काय, असा सवाल त्यांनी विचारला.

(हेही वाचा : ANALYSIS : झारखंडमध्ये नाही चाललं मोदी-शहा मॅजिक, देशात आक्रसतेय भाजपची सत्ता)

भारताने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. भारताच्या अंतर्गत बाबींवर मलेशियाच्या पंतप्रधानांनी टिप्पणी करू नये, या शब्दात भारताने त्याला उत्तर दिलंय. त्यामुळे दोन देशांत तणाव निर्माण झालाय.

कर कमी होणार नाही

पामतेलाचे भाव सतत वाढल्याने सरकार यावरचा आयात कर कमी करण्याची तयारी करत होतं. पण मलेशिया आणि भारतात तणाव वाढल्यामुळे त्याचा परिणाम पामतेलाच्या भावावर होतोय. सरकार आता पामतेलावरचा आयात कर कमी करण्याचा विचार करू शकत नाही. त्यामुळेच खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

=======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: foodmoney
First Published: Dec 23, 2019 03:09 PM IST

ताज्या बातम्या