Home /News /money /

दरमाह फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करुन 5, 10, 20 वर्षात मोठी रक्कम जमा होईल; चेक करा कॅलक्युलेशन

दरमाह फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करुन 5, 10, 20 वर्षात मोठी रक्कम जमा होईल; चेक करा कॅलक्युलेशन

म्युच्युअल फंड एसआयपी ही गुंतवणुकीची सिस्टमॅटिक पद्धत आहे. बर्‍याच फंडांचा दीर्घकालीन सरासरी वार्षिक SIP परतावा 12 टक्के किंवा त्याहून अधिक असतो.

    मुंबई, 28 मे : छोटी बचत करुन मासिक गुंतवणुकीची (Monthly Investment) सवय लावली तर तुम्ही भविष्यात लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक पर्याय आहे जिथे तुम्ही थेट मार्केट एक्सपोजर न घेता इक्विटी सारखा परतावा मिळवू शकता. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. दीर्घ कालावधीसाठी एसआयपी कायम ठेवल्याने चक्रवाढीचे प्रचंड फायदे मिळतात. जर तुम्ही 500 रुपयांची मासिक SIP सुरू केली असेल, तर तुम्ही पुढील 5, 10 किंवा 20 वर्षांत किती निधी तयार करू शकता. झी बिझनेसने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दीर्घकालीन सरासरी वार्षिक 12% परतावा म्युच्युअल फंड एसआयपी ही गुंतवणुकीची सिस्टमॅटिक पद्धत आहे. बर्‍याच फंडांचा दीर्घकालीन सरासरी वार्षिक SIP परतावा 12 टक्के किंवा त्याहून अधिक असतो. यामध्ये गुंतवणूकदारांना थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावा देखील पारंपारिक उत्पादनापेक्षा जास्त आहे. आर्थिक संकट कधीही येऊ शकतं, योग्य गुंतवणूक केल्यास अडचणीच्या काळात रडत बसावं लागणार नाही, कसं कराल प्लानिंग? 5 वर्षात किती पैसे जमा होतील? समजा, तुम्ही 500 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, सरासरी 12 टक्के परतावा दिला तर 41,243 रुपयांचा निधी तयार करू शकतो. यामध्ये तुमची 5 वर्षातील एकूण गुंतवणूक 30,000 रुपये असेल आणि अंदाजे परतावा 11,243 रुपये असेल. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीतही जोखीम असते हे लक्षात ठेवा. 10 वर्षात किती निधी? एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, 500 रुपयांची एसआयपी 10 वर्षे चालू ठेवून 1,16,170 रुपयांचा निधी तयार करू शकते. यामध्ये 10 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 60,000 रुपये असेल आणि अंदाजे परतावा 56,170 रुपये असेल. बँक खातं वापरात नसेल तर लवकर बंद करा, अन्यथा होईल नुकसान; फसवणुकीचाही धोका 20 वर्षात किती निधी? एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, 500 रुपयांची एसआयपी 20 वर्षे चालू ठेवून 4,99,574 रुपयांचा निधी तयार करू शकते. यामध्ये तुमची 20 वर्षातील एकूण गुंतवणूक 1.20 लाख रुपये असेल आणि अंदाजे परतावा 3,79,574 रुपये असेल. SIP वर गुंतवणूकदार उत्साही असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) ने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडांनी एप्रिल 2022 मध्ये 15,890 कोटी रुपयांचा नेट फ्लो पाहिला. इक्विटी फंडात सलग 14व्या महिन्यात ओघ आला आहे. मार्च 2021 पासून इक्विटी योजनांमध्ये सतत गुंतवणूक येत आहे. दीपक जैन, एडलवाइज म्युच्युअल फंडाचे प्रमुख म्हणतात की पद्धतशीर किंवा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आणि दीर्घकाळासाठी कमी जोखमीचे आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार नियमित गुंतवणुकीसाठी एसआयपीला प्राधान्य देत आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ परताव्यावर नसते तर रिस्क अॅडजस्टेड रिटर्नवर असते. भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठेत सतत चढ-उतार होत आहेत. FPIs कडून वारंवार आउटफ्लो होत असूनही, देशांतर्गत गुंतवणूकदारांचा विश्वास देशांतर्गत बाजारांमध्ये मजबूत आहे. यामध्ये, सर्वात सकारात्मक प्रवाह मजबूत SIP द्वारे आला आहे. एप्रिल 2022 मध्ये एसआयपीचा प्रवाह 11,863 कोटी रुपये होता. त्याच वेळी, एसआयपी खात्यांनी 5.39 कोटींचा विक्रमी उच्चांक गाठला. एप्रिलमध्ये 11.29 लाख नवीन SIP खाती जोडली गेली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या