Home /News /money /

'शेअरखान'ची 'या' स्मॉलकॅप ऑटो स्टॉकमध्ये गुंतवणुकीची शिफारस, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस

'शेअरखान'ची 'या' स्मॉलकॅप ऑटो स्टॉकमध्ये गुंतवणुकीची शिफारस, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस

बाजारातील तज्ज्ञ ऑटो सेक्टरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. या आठवड्याच्या अस्थिरतेच्या दरम्यान, सुप्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गॅब्रिएल इंडियामध्ये (Gabriel India) मजबुतीचा अंदाज वर्तवला आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर : ऑटो शेअर्ससाठी (Auto Shares) परिस्थिती अनुकूल राहिली आहे. ऑटो सेक्टरसाठी (Auto Sector) भविष्यातील चांगल्या शक्यता पाहता, बाजारातील तज्ज्ञ ऑटो सेक्टरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. या आठवड्याच्या अस्थिरतेच्या दरम्यान, सुप्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गॅब्रिएल इंडियामध्ये (Gabriel India) मजबुतीचा अंदाज वर्तवला आहे. शेअरखान सांगतात की, या स्टॉकमध्ये 173 रुपयांचे टार्गेटही पुढे जाताना दिसत आहे, सध्या हा स्टॉक 136 रुपयांच्या आसपास दिसत आहे. म्हणजेच, शेअरखानच्या (Sharekhan) मते, या स्टॉकमध्ये 27 टक्के वाढ सध्याच्या पातळीवरून सहज दिसून येत आहे. Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना बंपर कमाई; 2 रुपयांचा स्टॉक 195 रुपयांवर शेअरखानने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की गॅब्रिएल इंडिया सर्व सेगमेंटमध्ये सातत्याने नफा मिळवत आहे. मग ते टू व्हीलर असो वा थ्री व्हीलर किंवा प्रवासी वाहन. कंपनी सतत विकास साधत आहे. कंपनीने मजबूत उत्पादन क्षमता संपादन केली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहन विभागातील विस्तारामुळे आणि टू व्हीलर EV मध्येही कंपनीला पुढे जाण्याचे चांगले फायदे दिसतील. कंपनी OLA Electric, Okinawa, Ather Energy, TVS Motors, Bajaj Auto, M&M, Tube Investment of India सारख्या सर्व इलेक्ट्रिक वाहन OEM साठी प्रोडक्ट विकसित करत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील तेजीमुळे कंपनीच्या व्यवसायात पुढे जाऊन मजबूत वाढ दिसून येईल, असा विश्वास कंपनी व्यवस्थापनाला आहे. Star Health Insurance IPO मध्ये गुंतवणूकदारांचं 10 टक्के नुकसान, मात्र राकेश झुनझुनवालांनी कमावले 5418 कोटी FY2021 मध्ये, कंपनीने अनेक नवीन देशांतर्गत आणि परदेशात ऑर्डर मिळवल्या आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये मारुती सुझुकीसोबतच्या व्यवसायाला गती येण्याची अपेक्षा आहे. या बाबी लक्षात घेऊन शेअरखानने या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या