वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी GOOD NEWS; आता अगदी कमी पैशात लॅपटॉप खरेदीची संधी

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी GOOD NEWS; आता अगदी कमी पैशात लॅपटॉप खरेदीची संधी

अनेक कर्मचारी घरातूनच कंपनीचे दैनंदिन कामकाज करीत आहेत. यासाठी लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉप (Desktop) असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हीही लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल तर एकदा ही बातमी नक्की वाचा.

  • Share this:

नवी दिल्ली 23 एप्रिल : देशात सध्या कोरोनाचा (Corona) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि कोलमडलेली आरोग्य व्यवस्था पाहाता आपल्याला अनेक कठोर निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. घरातून विनाकारण बाहेर न पडण्यापासून ते सोशल डिस्टन्सिंगपर्यंतच्या अनेक नियमांचे पालन आपल्याला करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले कामकाज या कालावधीतही सुरु ठेवण्यासाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सुविधा दिली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी घरातूनच कंपनीचे दैनंदिन कामकाज करीत आहेत. यासाठी लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉप (Desktop) असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पर्सनल कॉम्प्युटर तसेच लॅपटॉपला बाजारात मागणी वाढली आहे. तसेच लॅपटॉप आणि डेस्कटॉपचे अनेक पर्यायही बाजारात उपलब्ध आहेत.

अशावेळी खासकरुन जेव्हा तुम्ही घरुन काम करत असता तेव्हा मनपसंत लॅपटॉपच्या शोधात असता, मात्र लॅपटॉप किंवा पर्सनल कॉम्प्युटरच्या किमती पाहून तो खरेदी करायचे धाडस होत नाही. त्यामुळे ही बातमी खास तुमच्यासाठी. जर लॅपटॉप खरेदी करायचा तुम्ही विचार करीत असाल तर, 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये वॉरंटी असलेले अनेक प्रोफेशनल लॅपटॉप सध्या बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या लॅपटॉप विषयी....

एचपी सीरिजमधील लॅपटॉपची प्रारंभिक किंमत आहे 13,999 रुपये

सेंकड हॅण्ड वस्तुंची विक्री करणाऱ्या ओएलएक्स (OLX) या पोर्टलचे नाव तुम्ही ऐकले असेलच. या पोर्टलवर वापरलेली वस्तू तुम्ही खरेदी करु शकता. या ओएलएक्सवर वापरलेल्या लॅपटॉपचे कलेक्शन (Used Laptop Collection) अशी जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये एचपीच्या (HP) सेकंड हॅण्ड लॅपटॉपची प्रारंभिक किंमत 13,999 रुपये आहे.

लॅपटॉवर गॅरंटी आणि वॉरंटीही -

जाहिरातीत या लॅपटॉपची कंडीशनA आहे. हे लॅपटॉप दोन प्रोसेसर intel core i3 आणि i5 मध्ये उपलब्ध आहेत. तसेच या लॅपटॉपची रॅम (RAM) 4GBआणि हार्डडिस्क (Hard disk) 320GB असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. लॅपटॉपमधील रॅम आणि हार्डडिस्क तुम्ही तुमच्या गरजेनुसार वाढवू शकता. तसेच सेलर या लॅपटॉपची गॅरंटी आणि वॉरंटीदेखील देत आहे. तुम्ही या पोर्टलवर अॅपलचे (Apple) मॅकबुक प्रो (Macbook Pro) देखील खरेदी करु शकता. कोरोना महामारीची स्थिती बघता, या लॅपटॉपची खरेदी केल्यानंतर त्याची फ्री होम डिलीव्हरी दिली जाणार आहे. तसेच यासाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट किंवा कॅश ऑन डिलीव्हरी सारखे पर्यायदेखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: April 23, 2021, 4:34 PM IST

ताज्या बातम्या