मोदी सरकार देतेय 1500 रुपयांपर्यंत स्वस्त सोनं खरेदीची संधी, होणार हे 3 फायदे

Sovereign gold bond, Modi Government - तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करायचं असेल तर जाणून घ्या या योजनेबद्दल

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 09:00 PM IST

मोदी सरकार देतेय 1500 रुपयांपर्यंत स्वस्त सोनं खरेदीची संधी, होणार हे 3 फायदे

मुंबई, 05 ऑगस्ट : तुम्ही स्वस्त सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर एक चांगली योजना आहे. सरकारच्या एका स्कीमद्वारे तुम्ही स्वस्त दरात सोनं खरेदी करू शकाल. साॅवरेन गोल्ड बाॅण्डची (Sovereign Gold Bond) नवी सीरिज आज ( 5 ऑगस्ट ) लाँच झाली. या स्कीम अंतर्गत तुम्ही 9 ऑगस्टपर्यंत सोन्याची खरेदी करू शकतात. सरकारनं साॅवरेन गोल्ड बाॅण्ड योजनेच्या नव्या सीरिजमध्ये 3,499 रुपये प्रति ग्रॅम सोन्याची किंमत आहे. 3 ऑगस्टला सोन्याची किंमत 3,674 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजे सरकारच्या स्कीमप्रमाणे तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर तुम्हाला ते 175 रुपये स्वस्त पडेल. गोल्ड बाॅण्डमध्ये गुंतवणूक केली तर व्याजही मिळेल. शिवाय ऑनलाइन खरेदीवर सरकार 50 रुपये सूटही देतेय.

इथून खरेदी करा सोनं

या बाॅण्डची विक्री बँका, स्टाॅक होल्डिंग काॅर्पोरेशन, ठराविक पोस्ट ऑफिल आणि एनएसई, बीएसई इथून होईल.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

काय आहे स्कीम?

Loading...

साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात 2015मध्ये झाली होती. सोन्याचे दागिने खरेदी करणं कमी व्हावं आणि सोन्याच्या खरेदीचा उपयोग बचतीसाठी व्हावा म्हणून हा बाॅण्ड सुरू झाला. सोनं खरेदी करून घरात ठेवण्यापेक्षा बाॅण्ड घेतला तर करही वाचतो.

ऑनलाइन पेमेंटवर मिळेल सूट

अर्थमंत्रालयानं म्हटलंय की, RBIशी चर्चा करूनच ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केलं तर 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट मिळते. अशा गुंतवणूकदारांनी गोल्ड बाॅण्ड 3,164 रुपये प्रति ग्रॅम मिळतो.

पेट्रोलच्या किमतीत घसरण, 'हे' आहेत आजचे भाव

2.5 टक्के मिळेल व्याज

स्कीममध्ये गुंतवणुकीवर 2.5 टक्के वर्षाला व्याज मिळेल.

कॅपिटल गेन टॅक्सची होईल बचत

यात गुंतवणुकीचा अवधी 8 वर्षांचा असतो. पण तुम्ही 5 वर्षांनंतर तुमचे पैसे काढू शकता. त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही.

EPFO नं बदलला PF मधून पैसे काढण्याचा नियम, 'या' आहेत नव्या अटी

कर्ज मिळू शकतं

गोल्ड बाॅण्ड पेपरवर कर्ज मिळू शकतं. हे पेपर्स पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग  सर्टिफिकेटप्रमाणे असतात.

मृत्यूच्या दाढेत 'तो' जीव मुठीत घेऊन उभा, पाहा हा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 5, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...