2 लाख रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि महिन्याला कमवा 50 हजार

2 लाख रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि महिन्याला कमवा 50 हजार

Business, Mudra Loan - मोदी सरकारच्या मदतीनं तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर बऱ्याच व्यवसायांना मोदी सरकार मदत करतं. म्हणजे कमी गुंतवणुकीत तुमचा जास्त फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उद्योगाची माहिती देणार आहोत. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 लाख रुपये गुंतवायचे आहेत. बाकी मदत सरकार करेल.

 टोमॅटो साॅसचा व्यवसाय : टोमॅटो साॅस किंवा टोमॅटो कॅचअपची मागणी घरात तर असतेच, पण हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्येही जास्त असते. हल्ली बाजारात लोकप्रिय ब्रँडसोबत लोकल ब्रँड आहेत. लोकल ब्रँडचा क्विलिटी चांगली असेल तर त्याचीही मागणी वाढते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करणं ही चांगली गोष्ट आहे.

सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

होणारा खर्च : 7.82 लाख रुपये. त्यात भांडवल 2 लाख रुपये ( यात मशीन्सवर होणारा खर्च आहे ). वर्किंग कॅपिटल 5.82 लाख रुपये ( यात टोमॅटो, कच्चा माल, साॅससाठी लागणारे पदार्थ, काम करणाऱ्यांचा पगार, पॅकिंग, टेलिफोन, भाडं हे खर्च येतात ).

सरकारकडून अशी मिळेल मदत : तुम्हाला 1.95 लाख रुपये गुंतवावे लागतील. टर्म लोन 1.50 लाख रुपये मिळेल. वर्किंग कॅपिटल लोन 4.36 लाख रुपये असेल. हे लोन मुद्रा योजनेमधून कुठल्याही बँकेकडून सहज उपलब्ध होईल.

खासगी कंपनीतही मोठी पगारवाढ, 'या' कंपन्यांसाठी आहे खूशखबर

असा होईल फायदा: 7.82 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर वर्षाला 28.80 लाख रुपये आर्थिक उलाढाल होऊ शकते. कास्ट आॅफ प्राॅडक्शन : 24.22 वर्षाला लाख रुपये, एकूण नफा मिळेल 4.58 लाख रुपये प्रति वर्षी, दर महिन्याचा नफा : जवळजवळ 40 हजार रुपये.

'ती' दागिने चोरून गिळायची; डॉक्टरांनी पोटातून काढलं दीड किलो सोन

असं मिळेल कर्ज : मुद्रा योजनेप्रमाणे तुम्हाला सरकारी बँकेत अर्ज द्यावा लागेल. तुम्हाला आधार, पॅन नंबर, तुमच्या घराची कागदपत्रं बँकेला द्यावी लागतील. बँक मॅनेजर व्हेरिफिकेशननंतर कर्ज मंजूर करतं.

असा करायचा अर्ज : तुम्ही कुठल्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक फाॅर्म भरावा लागेल. त्यात डिटेल्स द्यावे लागतील. नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, तुमची कमाई आणि किती कर्ज हवं हे सर्व द्यावं लागेल. यात प्रोसेसिंग फीज किंवा गॅरेंटी फीची गरज नाही.

VIDEO : फुटपाथवरून जात होती महिला, अचानक उघड्या गटारात पडली

Published by: Sonali Deshpande
First published: July 25, 2019, 6:43 PM IST
Tags: business

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading