गायीच्या शेणापासून तयार करा कागद, व्यवसायातून लाखो रुपये कमवण्याची संधी

गायीच्या शेणापासून तयार करा कागद, व्यवसायातून लाखो रुपये कमवण्याची संधी

गायीच्या शेणापासून कसा तयार केला जातो कागद? काय आहेत सरकारी योजना?

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: आयुर्वेदात गायीच्या शेणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी जेव्हा कुड्याच्या भिंतींची घर किंवा जमीन सारवण्यासाठी शेणाचा वापर केला जात होता. गायीच्या शेणाचा वापर अनेक गोष्टींमध्ये केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? गायीच्या शेणापासून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. कसं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सरकारने शेणापासून कागद तयार करण्याबाबत एक संशोधन केलं आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेलं हे संशोधन यशस्वी झाल्यामुळे देशभरात हा प्रकल्प राबण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. कागद तयार करण्यासाठी तुम्हाला गायीचं शेण आणि कागदाचा लगदा लागणार आहे.

नॅशनल हँडमेड पेपर इंस्टीट्यूटमध्ये गायीच्या शेणापासून पेपर तयार करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे तुमचा विश्वास बसणार नाही पण गायीच्या शेणापासून हॅण्डमेड पेपर तयार केला जात आहे. या कागदाचा दर्जा खूप चांगला आहे. तुम्ही या कागदाच्या पिशव्या तयार करून वापरू शकता आणि कागदाचं रिसायकलिंग करता येत असल्यानं पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

तुम्हाला जर हा व्यावसाय करायचा असेल तर सरकारी योजना आणि सब्सिडीही उपलब्ध आहेत. त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात. 5 लाखापासून 25 लाखांपर्यंत तुम्ही हा प्लांट तुम्ही खरेदी करू शकता.

हा हॅण्डमेड पेपर असल्यामुळे या प्लांटसाठी काही लोकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो. 15 लाखात तुम्ही प्लांट उभा करू शकलात तर कमीत कमी 10 लोकांना तरी रोजगार मिळू शकतो.

शेणापासून फक्त कागदच नाही तर वेजिटेबल डाय तयार करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.शेणात कागदासाठी लागणारं केवळ सात टक्के मटेरियल उपलब्ध होतं. बाकी 93 टक्के वेजिटेबल डाय तयार करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. हा वेजिटेबल डाय पर्यावरणासाठी अनुकूल आहे. त्याची निर्यातही केली जाते.

5 रुपये किलोमध्ये खरेदी करा शेण

कागद आणि वेजिटेबल डायसाठी शेतकऱ्यांकडून तुम्हा 5 रुपये प्रतिकिलो दरानं शेण खरेदी करावं लागले. एका गायीपासून साधारण दिवसाला 8 ते 10 किलोग्राम शेण मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील आणि तुमचा प्लांटही सुरू राहिल. साधारण 50 ते 60 रुपये शेतकऱ्यांना ह्या शेणापासून मिळू शकतात.

प्रकल्प उभा करण्यासाठी सरकारच्या काही योजना आहेत. या योजनांची माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळू शकते. सरकारच्या योजना आणि कर्जाबाबत माहिती घेऊन तुम्हा हा प्रकल्प साधारण 15 लाखांपर्यंत उभा करू शकता. एका प्लांटमध्ये महिन्याभरात 1 लाख कागद उत्पादित करण्याची क्षमता आहे. यासगळ्याची माहिती आणि पैशांचं उत्तम नियोजन केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

-------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2019 09:06 AM IST

ताज्या बातम्या