मराठी बातम्या /बातम्या /मनी /Business: कमी खर्चात करा औषधी वनस्पस्तींची शेती; होईल लाखोंची कमाई

Business: कमी खर्चात करा औषधी वनस्पस्तींची शेती; होईल लाखोंची कमाई

 आजकाल नोकरीसोबत एखादा छोटेखानी आवडीचा व्यवसाय (Business) करण्याचा ट्रेंड आला आहे. काही जण आपली नोकरी सांभाळून क्लबमध्ये जाऊन गिटार वाजवतात, काही जण मुलांचे क्लासेस घेतात, तर काही जण टेरेस गार्डनिंग वगैरे करतात. यातून त्यांना थोडेफार पैसैही मिळातात आणि त्यांची आवडही जोपासली जाते. अशीच आणखी एक बिजनेस आयडिया आज तुमच्यासाठी आणली आहे. तुम्ही नोकरी करता-करता शेती (Farming) करण्यास इच्छुक असाल, तर ही कल्पना नक्कीच तुमच्या उपयोगाची आहे.

पुढे वाचा ...

   मुंबई, 12 नोव्हेंबर-  आजकाल नोकरीसोबत एखादा छोटेखानी आवडीचा व्यवसाय (Business) करण्याचा ट्रेंड आला आहे. काही जण आपली नोकरी सांभाळून क्लबमध्ये जाऊन गिटार वाजवतात, काही जण मुलांचे क्लासेस घेतात, तर काही जण टेरेस गार्डनिंग वगैरे करतात. यातून त्यांना थोडेफार पैसैही मिळातात आणि त्यांची आवडही जोपासली जाते. अशीच आणखी एक बिजनेस आयडिया आज तुमच्यासाठी आणली आहे. तुम्ही नोकरी करता-करता शेती (Farming) करण्यास इच्छुक असाल, तर ही कल्पना नक्कीच तुमच्या उपयोगाची आहे. विशेष म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन नसली, तरीही तुम्ही ही शेती करू शकता. सध्या देशात औषधी वनस्पतींची (Medicinal Plant) लागवड करण्याकडे कल वाढला आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. सोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं शासनही औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे.

  औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी जास्त जमिनीची किंवा मोठ्या गुंतवणुकीची (Investment) गरज नसते. स्वत:च्या मालकीची जमीन नसल्यास तुम्ही करारावरही जमीन मिळवू शकता. कारण, आज काल अनेक कंपन्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांशी करार करत आहेत. औषधी वनस्पतींची लागवड सुरू करण्यासाठी थोड्या फार पैशांची आवश्यकता आहे. काही हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही काही लाख रुपये कमावू शकता.

  या वनस्पतींची करू शकता लागवड

  स्टीव्हिया (Stevia), शतावरी, सर्पगंधा, तुळस, आर्टेमिसिया अॅनुआ (artemisia annua), लिकोरिस, कोरफड, शतावरी, इसबगोल यांसारख्या औषधी वनस्पतींची तुम्ही लागवड करू शकता. यातल्या काही वनस्पती तर लहान कुंडीतही वाढवता येतात. आयुर्वेदीय औषधनिर्मितीत त्यांचा वापर होत असल्याने ही लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं.

  तुळस मिळवून देईल लाखो रुपये

  तुळशीचा (Basil) वापर सहसा धार्मिक कार्यांमध्ये केला जातो. परंतु त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे तुळशीची लागवड केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. युजेनॉल (Eugenol) आणि मिथाइल सिनामेट (Methyl cinnamate) हे घटक असलेल्या तुळशीचे अनेक प्रकार आहेत. या दोन्ही घटकांचा उपयोग कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर औषधं बनवण्यासाठी केला जातो. एक हेक्टरवर तुळशीचं उत्पादन घेण्यासाठी फक्त 15 हजार रुपये खर्च येतो. परंतु 3 महिन्यांनंतर त्यातून सुमारे 3 लाख रुपये मिळू शकतात.

  स्टीव्हियाची शेतीही फायद्याची

  स्टीव्हियाच्या लागवडीतली सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्यासाठी खत आणि कीटकनाशकांची गरज पडत नाही. कारण या वनस्पतीवर कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. एकदा लागवड केली, की त्यापासून सलग 5 वर्षं उत्पादन मिळतं. शिवाय दर वर्षी उत्पादनात वाढही होते. एक एकर क्षेत्रात स्टीव्हियाची लागवड करण्यासाठी 1 लाख रुपये खर्च येतो. त्यातून 6 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं, असं शेतकरी सांगतात. म्हणजेच शेतकऱ्याला 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. यामुळे शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात स्टीव्हियाची लागवड करत आहेत.

  स्टीव्हियाचा उपयोग डायबेटीसच्या रुग्णांसाठी केला जातो. सध्या डायबेटीसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्टीव्हियाची मागणीही वाढली आहे. स्टीव्हियाचं झाड 60 ते 70 सेंटीमीटर उंच असतं. अनेक वर्षं टिकणाऱ्या या झाडाला दाट फांद्या असतात. स्टीव्हियाची पानं सामान्य वनस्पतींसारखीच दिसतात; मात्र ती साखरेपेक्षा 25 ते 30 पटींनी गोड असतात. पॅराग्वे, जपान, कोरिया, तैवान आणि अमेरिका या देशांमध्ये त्याची लागवड केली जाते. भारतात बेंगळुरू, पुणे, इंदूर आणि रायपूर आदी ठिकाणी स्टीव्हियाची लागवड केली जात आहे.

  (हे वाचा:Business Idea: या व्यवसायासाठी सरकार करेल मदत; महिन्याला लाखोंची कमाई शक्य)

  औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी प्रशिक्षण आवश्यक

  औषधी वनस्पतींची लागवड सोपी असली तरी त्यासाठी काही गोष्टी अगोदरच माहिती असणं आवश्यक आहे. भविष्यात फसवणूक होऊ नये म्हणून चांगलं प्रशिक्षण गरजेचं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधली सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट्स (CIMAP) ही संस्था औषधी वनस्पतींच्या लागवडीचं प्रशिक्षण देते. फार्मास्युटिकल कंपन्यादेखील शेतकऱ्यांशी या संस्थेच्या माध्यमातून करार करतात, जेणेकरून इतरत्र फिरावं लागत नाही.

  खर्च आणि मिळणारं उत्पन्न लक्षात घेता औषधी वनस्पतींची लागवड करणं नक्कीच फायद्याचं आहे. त्यामुळे शेती करण्याचा विचार करत असाल, तर हा पर्याय चांगला ठरू शकतो.

  First published:
  top videos

   Tags: Business, Money