3 ते 4 लाखांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

3 ते 4 लाखांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

या व्यवसायात मेहनत कमी आणि कल्पकता जास्त वापरून तुम्ही तुमचा ब्रँड निर्माण करू शकता.

  • Share this:

मुंबई, 18 मे : तुम्हाला नियमित कमाई होईल असा व्यवसाय सुरू करायचाय? मग तुमच्यासाठी टोफू म्हणजे सोया पनीरचा प्लँट तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. टोफूच्या व्यवसायात मेहनत कमी आणि कल्पकता जास्त वापरून तुम्ही तुमचा ब्रँड निर्माण करू शकता. जवळपास 3 ते 4 लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. जाणून घेऊ याबद्दल-

PM मोदींची पत्रकार परिषद म्हणजे...राज यांनी केले ट्विट!

3 ते 4 लाखात सुरू होईल व्यवसाय

टोफूचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. यात मशीन्स आणि कच्चा माल याचा समावेश आहे. 2 ते 3 लाखात तुम्हाला बाॅयलर, जार, सेपरेटर, छोटा फ्रीजर इत्यादी वस्तू येतात. त्यानंतर 1 लाख रुपयांत तुम्हाला सोयाबीन खरेदी करावे लागतात. ज्यांना टोफू बनवता येतं, असे कारागीर तुम्हाला घ्यावे लागतील.

वाराणसीला पोहोचली सपना चौधरी, म्हणाली 'आएगा तो मोदी ही'

पहिल्यांदा तयार करावं लागतं दूध

टोफू बनवणं हे दुधापासून पनीर बनवण्याइतकं सोपं असतं. यात पहिल्यांदा तुम्हाला दूध तयार करावं लागतं. त्यासाठी सोयाबीनला पाण्यात उकळवावं लागतं. बाॅयलर आणि ग्राइंडरमध्ये एक तासाच्या प्रक्रियेत तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 लीटर दूध मिळतं. त्यानंतर ते दूध सेपरेटरमध्ये टाका. यामुळे दूध दह्यासारखं जाड होतं. त्यातून राहिलेलं पाणी काढलं जातं. जवळजवळ 1 तासाच्या प्रक्रियेनंतर तुम्हाला जवळजवळ 2.5 ते 3 किलोग्रॅम पनीर मिळतं.


सुरुवातीची कमाई 30 हजार रुपये

टोफूची बाजारातली किंमत 200 ते 250 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. तुम्हाला 1 किलोग्रॅम सोयाबीनवर पूर्ण प्रक्रियेनंतर जवळपास 2.5 किलोग्रॅम पनीर मिळतं. ते 500 रुपयांचं असतं. तुम्ही एक दिवसात 10 किलोग्रॅम पनीर तयार केलंत तर बाजारात याचा भाव 2 हजार रुपये असतो. तुम्ही रोज 30 ते 35 किलोग्रॅम टोफू तयार करून बाजारात विकले तर तुम्ही आरामात 1 लाख रुपये महिन्याला कमावू शकता.

हिमाचल प्रदेशातलं हे आहे जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र

सर्व जिल्ह्यात मिळतं कर्ज

छोट्या उद्योगांसाठी तुम्हाला कर्ज मिळतं. तुमचा प्रोजेक्ट तुम्ही जिल्हा उद्योग कार्यालयात दाखवायचा. तुम्हाला सबसिडीचं कर्ज मिळतं. केंद्र आणि राज्य सरकारच्या एसएमई प्रोजेक्टसाठी व्याजाशिवाय किंवा कमी व्याजाचं कर्ज मिळतं.


VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदींनी घेतलं केदारनाथाचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 11:10 AM IST

ताज्या बातम्या