फक्त 50 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, बाकीची मदत करेल सरकार

फक्त 50 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, बाकीची मदत करेल सरकार

सरकारनं व्यावसायिक वृत्ती वाढवण्यासाठी अनेक योजना आणल्यात. त्यातली एक क्वाॅयर उद्यमी योजना.

  • Share this:

मुंबई, 22 मे : सरकारनं व्यावसायिक वृत्ती वाढवण्यासाठी अनेक योजना आणल्यात. त्यातली एक क्वाॅयर उद्यमी योजना. ( Coir Udyami Yojana ). यात तुम्ही नवा व्यवसाय सुरू करताना काही सोप्या अटींबरोबर सरकार तुम्हाला कर्जाबरोबर सबसिडी देतं. यात 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. शिवाय कमी व्याजदरावर  55 टक्क्यापर्यंत कर्ज मिळतं.  क्वाॅयरशी संबंधित प्रोजेक्ट तयार करताना सरकार तुम्हाला कर्ज, सबसिडी याशिवाय अनेक सुविधा देतं. जाणून घेऊ काय आहे योजना?

महाराणी एलिझाबेथसोबत करियरची संधी, काम रोज 7 तास आणि मिळणार 'या' सुविधा

काय आहे सरकारी योजना?

क्वाॅयर बोर्ड, मिनिस्ट्री आॅफ मायक्रो, स्माॅल अँड मीडियम एंटरप्रायझेस ( MSME )च्या अखत्यारीत काम करतं. बोर्ड नारळाच्या काथ्यांपासून बनणाऱ्या वस्तूंना प्रमोट करतं. यात तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते.  तुम्हालाही हा व्यवसाय करायचा असेल तर फक्त 5 टक्के पैसे असले तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तुमच्या प्रोजेक्टला मान्यता मिळाली, तर बँक तुम्हाला 55 टक्के कर्ज सात वर्षांसाठी देऊ शकते. क्वाॅयर बोर्डाद्वारे 40 टक्के सबसिडी दिली जाते.

शेतकऱ्याची थट्टा; खरीप पिकाच्या अनुदानापोटी खात्यात आले केवळ 4 रूपये!

सरकार देते ही सेवा

या योजनेअंतर्गत सरकार कर्ज आणि सबसिडीबरोबर आणखी सेवा पुरवते. उदाहरणार्थ बोर्ड मार्केटिंग सपोर्ट असिस्टन्स. क्वाॅयर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मार्केटिंगची मदत केली जाते. तुमच्या वस्तू विकण्यासाठी शोरूम भाड्यानं घेण्यासाठी बोर्ड मदत करतं. त्यासाठी काम करणाऱ्यांना सरकार पगार देतं.

World cup : भारतीय संघाचा विमानतळावरचा 'स्टायलिश लुक'

कोण करू शकतं अर्ज?

या योजनेसाठी कुणीही व्यक्ती, कंपनी, सेल्फ हेल्प ग्रुप, एनजीओ, सोसायटी, कोआॅपरेटिव्ह सोसायटी, जाॅइन्ट ग्रुप, चेरिटेबल ट्रस्ट अर्ज करू शकतात. या योजनेसंबंधी तुम्ही क्वाॅयर बोर्ड आॅफिस, जिल्हा उद्योग केंद्र, क्वाॅयर प्रोजेक्ट आॅफिस इथे अर्ज करू शकता. आॅनलाइनही http://coirservices.gov.in/frm_login.aspx इथे अर्ज करू शकता.

VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

First published: May 22, 2019, 1:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या