मुंबई, 23 एप्रिल : लोक नेहमीच असा विचार करत असतात की छोट्या गावांमध्ये व्यवसाय करण्यासाठी कमी पर्याय आहेत. पण उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये राहणाऱ्या 26 वर्षांच्या शोभानं वेगळा व्यवसाय करून हे शक्य आहे, हे दाखवून दिलं. हा व्यवसाय आहे मधमाशा पालनाचा. एक एकरपेक्षा कमी जमिनीवर मधमाशीपालन आणि सोबत कुक्कुटपालन, मशरुम उत्पादनही सुरू केलंय. शोभा घरी बॅगा बनवण्याचंही काम करते. या सर्व व्यवसायातून शोभा एक वर्षात लाखो रुपयांची कमाई करते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, शोभानं तीन हजार महिलांना व्यवसायाचं प्रशिक्षणही दिलंय. याविषयीच जाणून घेऊ या -
मधमाशी पालन - शेतामध्ये हा व्यवसाय सुरू आहे. शोभाकडे 70 मधमाशा पालन बाॅक्सेस आहेत. त्या सांगतात, बाॅक्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येत नाही. यामुळे मधाचं उत्पादन जास्त होत नाही. वर्षभर 20 क्विंटल मध उत्पादन होतं. त्या सांगतात, बाॅक्स एका जागेहून दुसऱ्या जागी नेता आला तर हे उत्पादन जास्त होईल.
कुक्कुट पालन - शोभा सांगतात, या व्यवसायात कोंबड्यांची साफसफाई करण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. पोर्ल्टी फार्मच्या व्यवसायासाठी कोंबड्यांची चांगली देखभाल करावी लागते. त्यांना रोगराईपासून कसं वाचवायचं याचंही ज्ञान हवं. शोभा सांगतात, यात जवळजवळ 60 हजार रुपयांचा नफा होऊ शकतो.
छोट्या उद्योगांतून मोठा नफा कमावता येतो, हे अनेकांनी सिद्ध केलंय. यात गुंतवणूक कमी लागते. तुम्ही घरबसल्याही असे बरेच व्यवसाय करून स्वावलंबी होऊ शकता.
VIDEO: अर्ज दाखल करण्याआधी गौतम गंभीरने केलं होमहवन