नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: देशभरात पसरलेल्या कोरोनाचा (CoronaVirus) सामना करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. अशावेळी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर एक चांगला पर्याय तुमच्या समोर आहे. ज्यामध्ये तुम्ही केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक (Investment) करून लाखोंची कमाई करू शकता. तुमच्या घरापासून तुम्ही हा व्यवसाय (Business) सुरू करू शकता. विशेष म्हणजे याकरता तुम्हाला अतिरिक्त संसाधनांची देखील गरज नाही.
करू शकता मशरूम फार्मिंगचा व्यवसाय
सध्या देशात छोट्या ते मोठ्या स्तरावर मशरूम फार्मिंग केली जाऊ शकते. यातून दर महिन्याला तुम्हाला चांगली कमाई करता येईल. सुरुवातीला यामध्ये तुम्हाला जास्त जागा किंवा पैशांची आवश्यकता नाही आहे.
5 ते 6 हजारांची गुंतवणूक
एखाद्या खोलीतून देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातीला तुम्हाला यामध्ये 5 ते 6 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. मशरूम शेतीसाठी, तुम्हाला 30 ते 40 यार्डांच्या भूखंडाच्या खोलीत कंपोझेट (मशरूम वाढवण्यासाठी लागणारे माती आणि बियाणे मिश्रण) ठेवावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. हे मिश्रण तुम्हाला सावलीत किंवा एका बंद खोलीत ठेवावे लागेल. 25-30 दिवसात यामध्ये मशरूम उगवण्यास सुरुवात होईल.
मिळालेले उत्पन्न तुम्हाला थेट बाजारात विकता येईल किंवा सध्याच्या ट्रेंडनुसार तुम्ही मशरूमची ऑनलाईन विक्री देखील करू शकता. तुमच्या उपलब्धतेनुसार तुम्ही यामध्ये पैसे लावू शकता. सध्या बाजारात 150-200 रुपये दराने मशरूमचे एक पॅकेट विकले जाते आहे. त्यानुसार विक्री करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. त्याचप्रमाणे काही संस्था मशरूम लागवडीचे ट्रेनिंग देखील देतात.