फक्त 50 हजार रुपये गुंतवा, 10 महिन्यांमध्ये होईल लाखोंची कमाई

फक्त 50 हजार रुपये गुंतवा, 10 महिन्यांमध्ये होईल लाखोंची कमाई

तुम्हाला कमी कष्टात जास्त फायदा हवा असेल तर या वनस्पतीची शेती करा.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : हल्ली शेतीतही वेगवेगळे प्रयोग होतात. आता पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी शेती करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. सध्या शेवग्याच्या शेंगांची शेती तेजीत आहे. यासाठी तुम्हाला जमिनीचा मोठा भाग घेण्याचीही गरज नाही. याची शेती केल्यानंतर 10 महिन्यांनंतर एक एकर जमिनीवर शेतकरी एक लाख रुपये कमावू शकतो.

शेवग्याची शेंग एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची खासीयत अशी की, एकदा पेरणी केली की पुढचे चार वर्ष पेरणी करावी लागणार नाही.

शेवग्याच्या शेंगांचे सर्वच भाग खाण्यासाठी उपयोगी असतात. याच्या पानांचा उपयोग सॅलडमध्ये करता येतो. या वनस्पतीची पानं, फुलं आणि फळं सगळंच खूप पोषक असतात. यात औषधी गुण आहेत. यांच्या बियांपासून तेल काढता येतं.

गोरखपूरचे एक शेतकरी अविनाश  कुमार यांनी ही शेवग्याची शेती केली. त्यांनी एका एकरवर 1200 रोपटी लावली. त्याचा खर्च आला 50 ते 60 हजार रुपये. शेवग्याच्या झाडाची फक्त पानं विकली तरी वर्षाला 60 हजार रुपये कमाई होऊ शकते. शेवग्याच्या शेंगांवर तुम्ही दर वर्षी 1 लाखापेक्षा जास्त कमावू शकता.

या औषधी वनस्पतींची निर्यातही होते. अख्ख्या जगात याला मागणी आहे.उष्ण भागात याचं उत्पादन चांगलं होतं. या वनस्पतीला जास्त पाण्याची गरज नाही. 25 ते 30 अंश तापमानात याचं फुल उमलतं. शेवग्याच्या शेंगा 10 वर्ष चांगलं उत्पादन देतात.

नैसर्गिक उत्पादनं आणि औषधं यांची बाजारपेठ खूप मोठी आहे. नैसर्गिक उत्पादनांना नेहमीच मागणी असते. तेव्हा औषधी वनस्पतींची शेती करून खूप फायदा होऊ शकतो. यात मुद्दल कमी लागते, पण खूप वर्ष चांगली कमाई होऊ शकते.

औषधी वनस्पतींसाठी मोठ्या शेतांची गरज नाही. जास्त मोठी गुंतवणूकही लागत नाही. तुम्ही काँन्ट्रॅक्टवर औषधी वनस्पतींची शेती करू शकता. हल्ली अनेक कंपन्या काँन्ट्रॅक्टवर औषधांची शेती करतात. ही शेती करण्यासाठी सुरुवातीला काही हजार रुपये खर्च करावे लागतात. पण कमाई होते लाखोंची.

VIDEO: राहुल गांधींचा बायोपिक करणार का सुबोध भावे?

First published: April 10, 2019, 12:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading