Home /News /money /

ITR भरावा की नाही याबाबत संभ्रम आहे? इथे वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं

ITR भरावा की नाही याबाबत संभ्रम आहे? इथे वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं

कर भरणं आणि ITR भरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि लोकांनी त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असा बऱ्याचदा समज होतो. नोकरदार वर्गाला याबाबत माहित असणे आवश्यक आहे

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. अनेकांना याबाबत माहिती नसते, की आयटीआर भरणं आवश्यक आहे की नाही. कर भरणं आणि ITR भरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि लोकांनी त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असा बऱ्याचदा समज होतो. दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे केल्या जातात. इथं काही मुद्दे देत आहोत जे तुम्हाला ITR भरायचा किंवा भरायचा नसल्यास आपल्या ज्या शंका असतील त्या दूर करण्यात मदत करतील. एकूण उत्पन्न करमुक्त उत्पन्नापेक्षा अधिक एखाद्या व्यक्तीचं गुंतवणूक आणि खर्च करण्यापूर्वीचं एकूण उत्पन्न करमुक्त उत्पन्नापेक्षा अधिक असेल तर त्या व्यक्तीस ITR भरावा लागेल. कर सवलतीबाबत माहिती चॅप्टर VIA मध्ये मिळेल, ज्यात प्रामुख्याने 80C, 80 CCD, 80D, 80TTA, 80 TTB या कलमांतर्गत सवलत मिळते. घर कर्जाची परतफेड, जीवन विमा प्रीमियम आणि आरोग्य विमा प्रीमियम, EPF, PPF आणि NPS खात्यांत पैसे भरणार असल्यास तसंच बँकांकडून मिळणारं व्याज, मुलांच्या शिक्षणाची फी इत्यादी गोष्टींसाठी कर सवलतीचा पर्याय उपलब्ध आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांचं उत्पन्न वार्षिक अडीच लाख रुपये आहे त्यांना कर लागू होत नाही. ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आणि 80 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना वार्षिक 3 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसाठी वार्षिक 5 लाख रुपये उत्पन्नावर कर माफ आहे. कधीकधी असं होते की बऱ्याच कपाती लागू झाल्यानंतर एखाद्यचे उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली येतं. अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीस करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असूनही कर देण्याची आवश्यकता नसते. परंतु त्याला ITR दाखल करावा लागेल. लाँग टर्म कॅपिटल गेन्स (Long term Capital Gains) 2019-2020 या आर्थिक वर्षात लिस्टेड शेअर्सच्या आणि इक्विटीशी संबंधीत युनिटच्या विक्रीतून झालेल्या दीर्घकालीन नफ्यावर कर माफ केला आहे. तरीही ITR दाखल करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात कलम 10 (38) अंतर्गत सूट देण्यात आली होती. भारताबाहेर मालमत्ता किंवा बँक खाते असल्यास  आपल्या देशातील एखादा नागरिक करपात्र ठरत नसेल, परंतु देशाबाहेर त्याची मालमत्ता आहे, अशा परिस्थितीत त्याने ITR दाखल करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त, जर त्या व्यक्तीस देशाबाहेरील कोणत्याही खात्याच्या संदर्भात Signing Authority असेल तर त्याने ITR दाखल करणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत खात्यामध्ये कितीही बॅलन्स असला तरी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या