Amazon ला मोठा दणका, कंपनीतील गैरव्यवहाराविरोधात व्यापारी संघटनांची EDकडे तक्रार

Amazon ला मोठा दणका, कंपनीतील गैरव्यवहाराविरोधात व्यापारी संघटनांची EDकडे तक्रार

देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या (CAIT) कैटने ॲमेझॉन (Amazon) च्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ED केली आहे.

  • Share this:

 नवी दिल्ली, 7 डिसेंबर, : देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या (CAIT) कैटने ॲमेझॉन (Amazon) च्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ED केली आहे. ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ॲमेझॉनमुळे देशातील छोट्या उद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहे. कंपनीने 2012 पासून केलेल्या गैरव्यवहारांची लेखी स्वरुपातील माहिती ईडीकडे सोपवली असल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

ॲमेझॉनने सातत्याने देशातील व्यापारी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याचा फटका लहान व्यापाऱ्यांना बसतोय. या व्यापाऱ्यांना FDI आणि फेमा (FEMA) अंतर्गत संरक्षण देण्यात यावे अशी मागणी कंपनीने केली आहे. या प्रकरणात सातत्याने तक्रार केल्यानंतरही ॲमेझॉन कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. देशातील सात कोटी लहान व्यापाऱ्यांमध्ये यामुळे फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याचा दावा कैट संघटनेने केला आहे.

हे वाचा-FD वर 6.85 टक्के व्याजासह मिळतील चांगले रिर्टन्स, मोठ्या गुंतवणूकीचीही गरज नाही

कैट संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ॲमेझॉन कंपनीकडून होत असलेल्या फसवणुकीचा पाढा वाचला. “ॲमेझॉनसारख्या कंपन्यांकडून FDI, फेमा, वेगवेगळ्या प्रेस नोट यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. ॲमेझॉन सेलर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य साह्य्यक कंपन्या तसेच बेनामी कंपन्या ई कॉमर्स उद्योगांमध्ये सक्रीय आहेत’’, असा आरोप खंडेलवाल यांनी केला. या प्रकरणात ॲमेझॉन कंपनीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

हे वाचा-आता सूर्यावरही लागणार Made in China चं लेबल? वाचा नेमकं काय आहे प्रकरण

अमेरिकेतील बलाढ्य ॲमेझॉन कंपनीने भारतामध्ये पाऊल टाकल्यानंतर काही वर्षांमध्येच बाजारपेठेत मोठे वर्चस्व निर्माण केले आहे. यापूर्वी देखील कंपनीचे सीईओ जेफ जोसेफ भारत भेटीवर आले असताना कैट संघटनेच्या वतीने देशभर आंदोलन करण्यात आले होते. देशातील सात कोटी किरकोळ व्यापारी जगवण्यासाठी ॲमेझॉन कंपनीच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्याची मागणी कैटने सातत्याने केली आहे. आता या प्रकरणात संघटनेनं थेट ED कडे लेखी तक्रार केल्याने त्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published by: News18 Desk
First published: December 7, 2020, 9:31 AM IST
Tags: amazon

ताज्या बातम्या