Elec-widget

इनकम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर कसा मिळणार रिफंड? जाणून घ्या प्रक्रिया

इनकम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर कसा मिळणार रिफंड? जाणून घ्या प्रक्रिया

जर तुम्ही आर्थिक वर्ष 2018-19साठी इनकम टॅक्स रिटर्न फाइल केलं असल्यास रिफंडसंदर्भातील माहितीचा पाठपुरावा करणंही आवश्यक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : जर तुम्ही आर्थिक वर्ष 2018-19साठी इनकम टॅक्स रिटर्न फाइल केलं असल्यास रिफंडसंदर्भातील माहितीचा पाठपुरावा करणंही आवश्यक आहे. याद्वारे, आयकर परतावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही? याची माहिती तुम्हाला मिळेल. इतकंच नाही तर रिफंडसाठी आणखी कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे का? हेदेखील समजेल. इनकम टॅक्स रिटर्न त्याच करदात्यांना लागू होतं ज्यांनी आयटीआर दाखलं केलं आहे. आयकर विभागाकडून तुमच्या कराची तपासणी केली जाते, यानंतर दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला रिफंड मिळणार असेल तर ते तुमच्या खासगी बँक खात्यात जमा केलं जातं.

(वाचा :'मला तोंड उघडायला लावू नका, नाहीतर...',सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना इशारा)

तुम्हाला रिफंड मिळणार का नाही ? जाणून घ्या माहिती  

1. सर्वात आधी तुम्हाला इनकम टॅक्स ई- फायलिंग वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही पोर्टल लॉग इन करा. यानंतर तुम्हाला पॅन क्रमांक, ई-फायलिंग पासवई आणि Captcha कोड भरावा लागेल.

(वाचा : खूशखबर! रुपे डेबिट कार्डानं शाॅपिंग करा आणि मिळवा 'इतका' फायदा)

Loading...

2. तुमचं प्रोफाइल येथे तुम्हाला दिसेल. यानंतर View returns/forms वर क्लिक करावे.

3. ड्रॉप डाउन मेन्यूमधून Income Tax Returnsवर क्लिक करून आपली माहिती येथे भरावी. हायपरलिंक अकनॉलेजमेंट नंबरवर क्लि​क केल्यानंतर एक नवीन स्क्रीन तुम्हाला दिसेल.

(वाचा : आधार कार्डातल्या 'या' 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्रं)

4.यावर तुम्हाला ITR फायलिंगचं टाइमलाइन, टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेची माहिती मिळेल. तसंच आयकर परताव्याच्या पडताळणीची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, परतावा मिळण्याची तारीख आणि देय परताव्यासंदर्भातील सर्व माहिती दिली जाते.

5. जर तुमचं आयकर परतावा काही कारणास्तव फेल झाला. तर याचं कारणही तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जातं.

6. ITR भरल्यानंतर तो व्हेरिफाय करण्याचीही गरज असते. जर व्हेरिफाय केलं नाही तर ते अधिकृत धरलं जात नाही. रिटर्न्स भरल्यानंतर आपण आधार OTP च्या माध्यमातून व्हेरिफाय करू शकतो. त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडलेला असायला हवा. तुमच्या मोबाइल नंबरवर OTP आल्यानंतर तो इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर टाका. त्यानंतर तुमचे रिटर्न्स व्हेरिफाय होतील. याशिवाय तुम्ही बँकेचं ATM, DMAT अकाउंट आणि नेट बँकिंगच्या माध्यमातूनही ITR व्हेरिफाय करू शकता. तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर ITR भरणं आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाची मर्यादा 3 लाख आणि 80 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.

फ्री स्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील काही खास क्षण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 07:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...