
ख्रिसमस आणि न्यू ईयर निमित्ताने तुम्ही हा व्यवसाय करून उत्तम कमाई करू शकता. खरं तर हा व्यवसाय वर्षाचे 12 महिने चालणारा आहे. याची सुरुवात डिसेंबरमध्ये तुम्ही करू शकता. आजकाल प्रत्येक समारंभात केक कापायची फॅशन आली आहे.

बर्थ डे असो किंवा साखपुडा, लग्न किंवा सेलिब्रेशन म्हटलं की केक हवा असतो. तुम्ही केकचा व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता. यामध्ये देखील बरेच प्रकार आहेत. यामध्ये रवा केक, प्लम केक, फ्रेश क्रिम केक सारख्या केकला मोठी मागणी आहे.

तुम्हाला त्यासाठी काही आवश्यक असणाऱ्या मशीनरीज लागतील. यासोबत केक तयार करण्याचं सामान लागणार आहे. तुम्हाला थोडी जागाही लागणार आहे.

तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते. सुरुवातीला तुम्हाला जरी रिस्पॉन्स कमी आला तरी हळूहळू व्यवसाय वाढत जाईल. एकदा का लोकांना तुमची टेस्ट आवडली की तुमच्या ऑर्डर पक्क्या होऊन जातील.

या व्यवसायात तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. केकची चव कायम राखली जाईल याची काळजी घ्या. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे केकचं प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे. आकर्षक आणि चांगलं असायला हवं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंग उत्तम असणं आवश्यक आहे.

या व्यवसायात नाही म्हटलं तरी 30 टक्के नफा होतो. तुम्ही हा ५० टक्क्यांपर्यंत देखील मिळवू शकता. चांगली चव आणि उत्तम मार्केटिंग या दोन्ही गोष्टींमुळे तुम्ही चांगली कमाई करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.