दर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर सुरू करा 'हा' व्यवसाय

दर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर सुरू करा 'हा' व्यवसाय

Poultry Farming, Money, Business - त्यासाठी तुम्हाला 7 ते 9 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : नियमित कमाईसाठी तुम्ही कुठला पर्याय शोधत असाल तर कुक्कुटपालन व्यवसाय करू शकता. याला लेयर बर्ड फार्मिंगही म्हणतात. म्हणजे अंड्यांसाठी कोंबड्या पाळणं हा एक व्यवसाय आहे. तुम्ही 1500 कोंबड्या घेऊन कुक्कुटपालन सुरू शकता. तेव्हा तुमची कमाई 50 ते 1 लाख रुपयांपर्यंत दर महिन्याला होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला 7 ते 9 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. तुम्ही चांगलं प्रशिक्षण घेऊन फार्मिंग सुरू करू शकता. मग तुम्हाला पहिल्याच वर्षी आर्थिक फायदा होईल.

5 ते 6 लाख रुपये खर्च

तुम्हाला पहिल्यांदा पिंजरा, इक्विपमेंट यासाठी जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये खर्च करावा लागेल. 1500 कोंबड्या आणि त्यांना लागणारे पिंजरे. पिंजरे जास्त खरेदी करून ठेवा. कोंबड्यांना आजार होऊ शकतो.

LIC कडे तुमचे पैसे पडून तर नाहीत? घरबसल्या करा चेक

कोंबड्या खरेदी करण्याचं बजेट 50 हजार रुपये

एका लेयर पॅरेंट बर्थची किंमत जवळजवळ 30 ते 35 रुपये असते. कोंबड्या खरेदी करण्याचं बजेट 50 हजार रुपये लागेल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं धान्य द्यावं लागतं. याशिवाय त्यांच्या औषधांवरही खर्च करावा लागतो.

बजेटमध्ये करदात्यांना मिळू शकते 'ही' मोठी सवलत

20 आठवड्यांचा खर्च 3 ते 4 लाख रुपये

20 आठवड्यांपर्यंत कोंबड्यांना खाद्य देण्याचा खर्च 1 ते 1.5 लाख रुपये आहे. एक लेयर पॅरेंट बर्ड वर्षभरात जवळजवळ 300 अंडी देतं. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देणं सुरू करतात. वर्षभर अंडी देतात. 20 आठवडे त्यांच्या खाण्या-पिण्यावर जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात.

खुशखबर, सोनं 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

वर्षाला 14 लाख रुपयांपर्यंत कमाई

1500 कोंबड्या दर वर्षी 4,35,000 अंडी देतात. नुकसान होऊन 4 लख अंडी वाचली तर एक अंडं 3.5 रुपयांना पडतं. म्हणजे वर्षभर तुम्ही अंडी विकून 14 लाख रुपये कमाई करू शकता. हा व्यवसाय  सुरू करण्याआधी तुम्ही चांगलं ट्रेनिंग घ्या.

VIDEO: 'मोदींच्या नेतृत्त्वात यांना यश मिळालं, या यशाचा उन्माद चढलाय'

First published: July 2, 2019, 1:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading